तातडीने नरभक्षी वाघाला जेरबंद करून बंदोबस्त करण्यात यावा ; कविटपेठ येथील शेतकऱ्यांची मागणी

0
432

तातडीने नरभक्षी वाघाला जेरबंद करून बंदोबस्त करण्यात यावा ; कविटपेठ येथील शेतकऱ्यांची मागणी

विजयभाऊ वडडेट्टीवार
पालकमंत्री चंद्रपूर यांना वनपरिक्षेत्र अधिकारी विरुर(स्टे.) मार्फत दिले निवेदन

विरुर(स्टे) अंतर्गत येणाऱ्या धानोरा, कविटपेठ, सुब्बई आणि चिंचोली(बु.) या गावालगत असलेल्या वन क्षेत्रात एक वाघ मागील अनेक दिवसांपासून नेहमी लोकांना आढळून आला आहे. हा वाघ नेहमी गावालगत शेत शिवरावर भ्रमंती करीत असतो. त्यामुळे लोकांना शेतात कामासाठी जाणे सुद्धा जीव गमावण्या इतपत झाले आहे. या नरभक्षी वाघाची दहशत या परिसरात खुप वाढलेली आहे. या पिसाळलेल्या दहशती वाघाद्वारे काही लोकांवर हल्ला होण्याचा खूप वेळा प्रयत्न झाला आहे. या अगोदर या परिसरात दोघांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. 22 जुलैला कविटपेठ येथील तुळशीराम आत्राम या वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला केला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा कसाबसा जीव वाचला आहे. हि घटना ताजी असताना काल पोळ्याच्या दिवशी दहेगाव मंदिर परिसरात शांताराम बोबाटे या शेतकऱ्यावर त्यांच्या शेतात सर्व्हे क्रमांक 158/2 मध्ये दुपारी तीन वाजता सदर नरभक्षी वाघाने हल्ला चढविला. आरडाओरड केल्याने वाघाने पलायन केले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. या होणाऱ्या जीवघेण्या गैरसोयीची तातडीने दखल घेऊन नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी जोर लावून धरली.

सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना शेतात नित्यनेमाने जावे लागते. शेती जंगलालगत असल्यामुळे वाघाच्या हल्ल्याची भीती आहे. नरभक्षी वाघाच्या दहशतीमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक शेतात कामाला जाण्यासाठी घाबरत आहेत. शेतात काम नाही करणार तर जगणार कसे ? जर शेतात जाणार तर वाघाची भीती. अशातच शेतीतील खरीप हंगामाचे होणार कसे? असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. आम्हा शेतकऱ्यांचे शेती हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असून लॉकडाउन मुळे पहिलेच अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती हंगाम गेला तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. याला सर्वस्वी जबाबदार आपण असाल असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला.

या बाबीची तातडीने दखल घेत लवकरात लवकर या नरभक्षी वाघाला जेरबंद करून बंदोबस्त करण्यात यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

यावेळी शांताराम बोबाटे, नत्थुजी बोबाटे, माधव बोबाटे, सुशील धोटे, बाबुराव नक्कावार, नामदेव सोयाम, ताराचंद चांदेकर, प्रभाकर कडुकर, शंकर सोयाम, अनिल तेलसे, किशोर चांदेकर, शरद सोनटक्के, मनोज चहारे, सुधीर बोबाटे, सुकय्या नक्कावार, कुशाब बोबाटे, महादेव देठे, पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संघटक आनंदराव देठे सह कविटपेठ येथील आदी शेतकऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here