गस्तीवरील STPF मधील वन कर्मचारीवर वाघीणीचा हल्ला…!

0
543

गस्तीवरील STPF मधील वन कर्मचारीवर वाघीणीचा हल्ला…!

 

चिमूर/प्रतिनिधी : पळसगाव गावाजवळ एक वाघीणीने दोन गोरे खाल्ल्याने गावातील नागरीक भयभीत होते, या वाघीणीस गावापासून जंगलात हाकलून लावण्यासाठी वनविभागाचे अधिकारी/कर्मचारी पाळत ठेवून होते.

 

बुधवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास वनविभागाचे STPF पथक हे पारंपारीक पद्धतीने फटाके फोडून वाघीणीला गावापासून जंगलात हाकलून लावण्यासाठी 12-12 कर्मचारीचे पथक तयार करुन गस्तीवर गेले असता, झुडूपामध्ये लपून बसलेली वाघीणने अचानक पथकावर हल्ला केला. यावेळी वाघीणीने वन कर्मचारी श्री. सुनिल गाजलवार यांचे दोन्ही हात व डोके पंजाने पकडले व वन कर्मचारीवर जोरदार हल्ला चढविला. वाघीणीने वन कर्मचारीस जबडय़ात पकडल्याने वन पथकातील सहकारी कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून वाघीणीस पिटाळून लावण्यात यश मिळविले. सोबतचा सहकारी वन कर्मचारी सुनिल गाजलवार यास गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर प्रथम सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथ उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले, सध्या जखमी कर्मचारी सुनिल गाजलवार वर उपचार सुरू आहे.

व्याघ्रप्रकल्पात/चिमूर परीक्षेञात असणाऱ्या वाघ आणि बिबट हे शेतक-यांचे जनावरे किंवा जीवीत्त हानी करीत असल्यास अशा वन्यप्राण्यांवर पाळत ठेऊन गावापासून वाघाला जंगलात हाकलून लावण्यासाठी वनविभागात पारंपारीक पद्धतीचा अवलंब करीत असतात…. वाघाने वन कर्मचारी सुनिल गाजलवार वर हल्ला केल्यानंतर सोबतच्या STPF पथकातील कर्मचा-यांनी जोरदार आरडाओरडा व जवळील काठीने हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्यावर वाघीणीने पळ काढली. सध्या वन कर्मचारी सुनिल गाजलवार यांची प्रकृती ठिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

वनविभागाचे गस्तीवरील कर्मचा-यांना आधुनिक सुविधा द्या! – महेश देवकते

जिल्हा महामंत्री भाजयुमो चंद्रपूर तथा उपसभापती प.स. जिवती

 

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-चिमूर राखीव वनक्षेत्रात वन कर्मचारी-वन्यजीव संघर्षात दिवसेंदिवस वाढ होतं असून, वाघ हल्ल्यात मानवाचे मृत्यूच्या संख्येतही चिंताजनक वृद्धी दिसून येत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मा.मुख्यमंञी यांनी सर्वंकष उपाय योजना करून गस्तीवरील कर्मचा-यांना आधुनिक गाडया, स्वरक्षणासाठी साहीत्य तात्काळ पुरविण्यात यावे याकरीता मुख्यमंञ्यांना निवेदनाद्वारे महेश देवकते जिल्हा महामंत्री भाजयुमो चंद्रपूर तथा उपसभापती प.स.जिवती यांनी मागणी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here