अखेर दुचाकी चोरटे पोलीसांच्या ताब्यात 

0
551

अखेर दुचाकी चोरटे पोलीसांच्या ताब्यात 

१४ दुचाकींचा शोध घेण्यास पांढरकवडा पोलीसांना यश

 

पांढरकवडा तालुका प्रतिनिधी✍🏻 रवि गुरनुले :- पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी चोरी प्रकरणात गुन्ह्याची नोंद होती त्या अनुशंगाने पोललीसाचा तपास सुरू असताच आज दि.12 रोजी पोलीसांना गोपनिय माहीती मिळताच चार आरोपिंना अटक करून त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त करण्यात आले आहे तसेच आरोपिंकडून आणखी शोध सुरू आहे. आरोपी घाटंजी तालुक्यातील साखरा येथील 1) सागर तुळशीराम भेंटारे वय 23 वर्षे राहणार तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ 2) विजय रामराव दडाजे वय 23 वर्षे राहणार साखरा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ 3) सुनील नामदेव जाधव राहणार सातारा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ ४) विजय विलास ढोले वय 26 वर्षे रा साखरा ता घाटंजी जि यवतमाळ ऐकून 14 मोटार सायकल जप्त करण्यात आले.

सदर चोरट्यांनी दुचाकी चोरून ईतर लोकांना विकल्या होत्या या सर्व हेराफेरीची माहीती पोलीसांनी आरोपींकडून सखोल चौकशी करून एकुन 14 दुचाकी जप्त केल्या आहे. पांढरकवडा पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार प्रकाश क्षिरसागर यांना या दुचाकी चोरट्याची गोपनिय माहीती मिळताच त्यांनी पांढरकवडा पोलीस डी.बी पथक यांना माहीती दिली व त्यानंतर डिबी पथकाने घाटंजी तालुक्यातील साखरा या गावी जावून मिळालेल्या माहीतीवरून चोरट्यांच्या घरी धाड मारून चार आरोपींना अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here