कत्तलीसाठी जाणाऱ्या ४८ जनावरांना गडचांदूर पोलिसांनी दिले जीवनदान ; अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कारवाईचे धाडसत्र २५ लाख १२ हजार रुपयांचा माल जप्त, श्रीकृष्ण गोशाळा व सेवा संस्था गोंडपिपरी येथे जनावरे दाखल

0
739

कत्तलीसाठी जाणाऱ्या ४८ जनावरांना गडचांदूर पोलिसांनी दिले जीवनदान ; अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कारवाईचे धाडसत्र

२५ लाख १२ हजार रुपयांचा माल जप्त, श्रीकृष्ण गोशाळा व सेवा संस्था गोंडपिपरी येथे जनावरे दाखल

गडचांदूर (कोरपना), प्रतिनिधी (१२ जून) : नव्याने रुजू झालेले अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कारवाईचे धडाकेबाज सत्र राबवित असल्याने अवैध धंदेवाईकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात अवैध धंदे व्यवसायिकांच्या मुसक्या आवळण्याच्या कारवाईला वेग आला आहे. गडचांदूर पोलिसांनी चंद्रपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात २ सहा चाकी ट्रक जप्त करत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ४८ जनावरांची सुटका केली. सदरची कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना नुसार गडचांदूर चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी सदर वाहने थांबवून वाहनाची तपासणी केली असता हा प्रकार उजेडात आला.
अतिशय निर्दयतेने व क्रूरतेने कत्तलीसाठी कोंबून तेलंगणात नेण्यात येणारी ५ लाख १२ हजार रुपये किमतीची ४८ जनावरे व २ ट्रक (एम एच ४० बि एल १०७९ व टी एस ०७ यु बी ०४७२) किंमत २० लाख रुपये असा एकूण २५ लाख १२ हजार रुपयेचा माल जप्त केला. जप्त केलेली जनावरे श्रीकृष्ण गोशाळा व सेवा संस्था गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आली.
सदर कारवाईत आरोपी शिराज बक्कसुदीन पठाण (२४) रा. राजेंद्र नगर, जि. रंगारेड्डी (तेलंगणा), वॉर्ड क्र ४ गडचांदूर येथील शेख सारिक शेख मुर्रा (२६) व फारुख खान गफार खान (२२) यांच्या ताब्यातून जनावरे जप्त केली. तसेच फरार आरोपी संजय शंकराव वालदे, कलोडे भवन हिंगणघाट जि वर्धा व गडचांदूर येथील जनावर मालक इमरान शेख असे ५ आरोपी विरुद्ध गडचांदूर पोलीस स्टेशन येथे कलम ११ (१) (ड), प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधि. १९६० सह कलम ५ (अ), ५ (ब), ९, ११ महाराष्ट्राचा प्राणी संरक्षण अधि. १९७६ सुधारित २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती, नापोशी धर्मराज मुंढे, पोशी सुभाष तिवारी, प्रभू मामीडवार, व्यंकटेश भटलाडे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here