स्टेट बँकेने नवीन कर्ज वाटप सुरू न केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष

0
485

स्टेट बँकेने नवीन कर्ज वाटप सुरू न केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष

कोरपना/प्रतिनिधी : कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्याला गडचांदुर येथे एकमेव असलेल्या राष्ट्रीयकृत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक असून येथून कोरपना, पारडी, परसोडा या तीस चाळीस की.मी. पर्यंत च्या वरील शेतकरी या बँकेत व्यवहार करतात व शेतकऱ्या ची पेरणी ची वेळ जवळ येऊन सुद्धा बँकेत कर्ज वाटप सुरू झाले नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आता ना इलाजाने सावकारा चे घर भरण्याची शेतकऱ्यावर पाळी आली आहे. तिकडे कृशिकेंद्र वाले उधार माल बी, बियाणे, खत, औषधी, उधरीत देण्यास तयार नाही. अश्या परिस्थितीत शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून बँकेने लवकर पीक कर्ज वाटप सुरू करावे अशी शेतकऱ्यांची मागणी असून यासाठी राषट्रवादी काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष डॉ. कवडू पिंपलकर व महिला यांनी आंदोलनाचा इशारा बँकेला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here