तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

0
506

तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

गोंडपीपरी (चंद्रपूर), प्रतिनिधी : कोरोना मुळे जगभरात हाहाकार माजला असतांना विद्यार्थी वर्ग हा महाविद्यालये व शाळा बंद असल्याने नैराश्यातून जातांना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम ऑनलाईन च्या माध्यमातून घ्यावे हा विचार करून यिन व यंग ब्रिगेड गोंडपीपरी यांच्यावतीने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

तालुक्यातून एकूण ४८ विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला.त्यापैकी प्रथमतः उत्कृष्ट १० चित्रांची निवड करण्यात आली. माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

उत्कृष्ट १० विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने तेजस्विनी सातपुते, अनुश्री झुराले, चैतन्या मारगोनवार, प्रतीक्षा दुधे, निशा चहांदे, वैष्णवी कुंदोजवार, जान्हवी गोविंदवार, समीक्षा नैताम, स्नेहल नैताम यांची निवड करण्यात आली होती.

या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाशिक्षक श्री. हेमंत कत्रोजवार व कलारत्न पुरस्कार विजेत्या कु.अंकिता नवघरे यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली. चित्रकला स्पर्धेत स्नेहल नैताम प्रथम, चैतन्या मारगोनवार व्दितीय, अनुश्री झुराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना पोलीस स्टेशन गोंडपीपरी येथे ठाणेदार श्री संदिप धोबे यांच्या वतीने रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

बक्षिस वितरण प्रसंगी गोंडपीपरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार संदीप धोबे, यिन जिल्हाध्यक्ष अनिकेत दुर्गे, यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष श्री सूरज माडूरवार, पत्रकार समीर नीमगडे, प्रमोद दुर्गे, यिन सदस्य आशिष फुलझेले, सत्यवान सुरपाम यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here