डॉ. धगडी व डॉ मुसळे ठरले गरिबांचे दूत.. नाते आपुलकीचे आर्थिक सहकार्य

0
527

डॉ. धगडी व डॉ मुसळे ठरले गरिबांचे दूत.. नाते आपुलकीचे आर्थिक सहकार्य
पडोली- आजच्या काळात सामान्य जनतेला खाजगी दवाखाना म्हटलं की दोन चार वर्षांची कमाई दवाखान्यात द्यावी लागते..
काही अकस्मात होणाऱ्या दुर्घटना असो की काही क्रिटिकल केसेस यांच्या साठी खाजगी मध्येच सेवा उपलब्ध असते..
यवतमाळ मधील वणी तालुक्यातील मुर्धोनी (पळसोनी ) गावातील रविना सोनटक्के वय 18 या मुलीला वणी येथील मॅरेथॉन मध्ये धावत असतांना अपघात झाला त्या दरम्यान चंद्रपूर येथील नामवंत डॉ कडे भरती करण्यात आले आय सी यु (I C U) मध्ये भरती असल्याने मुलीला काय झालं याच योग्य पण माहिती तिथून मिळत नव्हती.. मुलीच्या आई वडील आधीच चिंतेत मोलमुजुरी करणारे सोनटक्के दाम्पत्यांनी 20 हजार रुपये व्याजावर घेऊन आले होते आपल्या मुलीच्या जीवासाठी लागणाऱ्या खर्चाची त्यांच्यावर चिंता होती.. त्या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार योग्य होत नसल्याने मुली मध्ये सुधारणा होत नसल्याने सुट्टी मागितली असता दोन दिवसाचे 32 हजार खर्च आला त्या क्षणी वणी मधील त्या मुलीचे शिकविणारे कोच योगेंद्र शेंडे युवा नवरंग क्रिडा मंडळ वणी व तिच्या सोबत प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांनी मिळून तिथून सुट्टी घेऊन मुसळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले..पण आता त्या परिवारांसमोर प्रश्न होता पैशांचा.. पण डॉ सचिन धगडी व डॉ विनोद मुसळे यांना सामान्य जनतेची जाणीव असल्याने त्या मुलीला योग्य ट्रीटमेंट देऊन तिला जीवनदान दिले सोबत तेथील लागणाऱ्या उपचाराचा खर्चही भरपूर कमी प्रमाणात घेतला. नाते आपुलकीचे बहु संस्था चंद्रपूर च्या वतीने तिच्या उपचाराला लागणाऱ्या व औषधोपचार लागणाऱ्या खर्चाला मुलीला १५ हजाराची आर्थिक मदत संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आणी शहर शिवसेना अध्यक्ष श्री राजू भाऊ तूरानकार पाच हजार, विराज चिकणकर , सोपान लाड सर आय केन अकादमी वणी
यांची सुद्दा आर्थिक मदत लाभली त्या वेळी डॉ सरांचे अभिनंदन करण्यात आले त्यावेळी नाते आपुलकीचे संस्थेचे संघटक राजेश पहापळे, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, किशोर तुराणकर, किसन नागरकर , हितेश गोहोकर, योगेंद्र शेंडे (कोच) , गणेश आसुटकर (कोच) फिजिकल केरीअर अकादमी वणी
दिनेश मुरस्कर, राम ठावरी, योगेश मनगटे, कुणाल नित, पवन ढेंगळे, नयन भोज, पवन बुरान, विजय बोरकर, आकाश पुसनाके, गुड्डू जाधव , कु. पूजा लोहारे, शीतल बांगडे, वैष्णवी भुरसे आणी समस्त युवा नवरंग क्रिडा मंडळ वणी..इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here