भगवान महाविर जंयती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था
भगवान महाविर जयंती निमित्त शहरातुन निघालेल्या शोभायोत्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडचे प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, शहर संघटक रुपेश पांडे, बादल हजारे, हेरमन जोसेफ, तिरुपती कलगुरुवार, राहुल मोहुर्ले यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान महाविर जयंती निमित्त शहरातुन शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शोभायात्रा जटपूरा गेट जवळ पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी भगवान महाविर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन नमन केले. तर शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी शितपेय देत त्यांना महाविर जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात.