आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन

0
459

आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रपतीराज्यपाल यांना निवेदन

 

कोठारी (बल्लारपूर) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे मनोरुग्ण आमदार आणि शिवसेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. तरी या मानसिक रुग्ण असलेल्या आमदार संतोष बांगर यांच्या वरती कडक कारवाई तसेच आमदारकी रद्द करावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने पोलीस स्टेशन कोठारीचे ठणेदार प्रमोद रासकर मार्फत राष्ट्रपती – राज्यपाल यांना निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे, तालुका उपाध्यक्ष लखन उराडे, ग्राम पंचायत सदस्य अमोल कातकर, ग्राम शाखा अध्यक्ष अनिल विरुटकर, नितीन रायपूरे, विनोद कुळसंगे, आशीष खोब्रागडे, मनोज रंगारी, अशोक खोब्रागडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here