पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देणेचांगलेच पडले महागात ●चिखलगाव येथील घटना
यवतमाळ, मनोज नवले
दारूच्या नशेत असलेल्या प्रफुल दादाजी ढुमणे यांनी आपल्या पत्नीला मारहाण शिवीगाळ आणि चरित्रावर संशय घेणे मानसिक त्रास देणे व घराबाहेर हाकलून देणे सासरच्या मंडळींना चांगलेच महागात पडले असून पती सासरे व सासू यांच्याविरुद्ध वनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
काही वर्षांपूर्वी प्रफुल सोबत नंदा येथील एका यूवतीशी विवाह झाला. आणि घरात सर्व काही आलबेल होते .मात्र काही दिवसांनी त्यांच्या स्वभावात अचानक बदल झाला व पत्नीला मानसिक त्रास आणि चारित्र्यावर संशय घेणे ह्याच जाचाला कंटाळून सदर महिला आपल्या माहेरी गेली होती आणि 18 तारखेला आपल्या पतीच्या घरी परत आली. मात्र त्यानी आपल्या पत्नीला घरातून हाकलून दिले. सदर महिला वापस आपल्या माहेरी गेली आणि घडलेली घटना सर्वकाही आपल्या भावाला सांगून तीने थेट वणी पोलिसात तक्रार दाखल केली असून प्रफुल दादाजी दुमने 32 कांताबाई दादाजी ढुमणे व दादाजी उद्धव ढुमणे यांच्यावर 498 (अ) 504,506, 34 नुसार वनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो. नी. श्याम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात जमादार बुर्रेवार करीत आहे.