शासकीय कार्यालयात संविधानाच्या उद्देशिका भेट
राजू झाडे यांचा प्रेरणादायी उपक्रम
गोंडपिपरी : जनतेच्या हितासाठी संविधानाची निर्मिती झाली आहे संविधानाच्या आधारावर देश चालतो. सविधानाचे महत्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना व तेथील कर्मचाऱ्यांना कडावे या उदात्त हेतूने राजू झाडे यांनी उद्देशिका भेट दिली
सामाजिक दायित्व जोपासणारे व्यक्तिमत्व पत्रकार राजू झाडे दि. १८ सोमवारी त्यांचा जन्मदिन होता. जन्मदिनानिमित्य होणारा अनावश्यक खर्च टाळून गोंडपरितील पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय,जनता महाविध्यालय, तहसील कार्यालयात सविधानाची उद्देशिका भेट दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडूरवार, पत्रकार नितेश डोंगरे, बाळू निमगडे, चंद्रजित गव्हारे, समीर निमगडे, निलेश झाडे, प्रमोद दुर्गे, तुकाराम सातपुते, प्रसेनजीत डोंगरे, नितीन पुढटवार, शुभम भोयर यांची उपस्थिती होती.