४९ हजाराच्या चोरीच्या मुद्देमालासह आरोपीला अटक
गोंडपिपरी पोलिसांची कारवाई
गोंडपिपरी : पोलिस स्टेशन गोंडपिपरीच्या हद्दीतील वडकुली येथील सिताबाई रामदास हिंगाणे रविवारीला शेतात गेल्या.याचवेळी घरी चोरी झाली.लागलिच पोलिसात तक्रार दिली.अज्ञात व्यक्तिविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करून काही तासातच आरोपीला शोध घेऊन ताब्यात घेतले.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून सिताबाई या शेतीकामाकरिता शेतात गेले.संधी साधून आरोपी संतोषने घराच्या दरवाज्याचे कुलूप तोंडून घरातील लाकडी संदुकात ठेवलेले एक १५ ग्रॅम सोन्याची गोप आणि पाच हजार रुपये रोख चोरून नेले.गोंडपिपरी पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच संशयाच्या आधारावर तात्काळ तपासणी चक्रे फिरवून काही तासातच आरोपीचा शोध घेतला.आरोपी संतोष गणपत आत्राम (३०) वडकुली याला ताब्यात घेतले. रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहृ.सदर कारवाई ठाणेदार संदिप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी सरजू कातकर,शंकर मने,विजय पवार,नासिर सय्यद यांनी केली.