‘मेरा बूथ सशक्त बूथ’ अभियान अंतर्गत आमदार डॉ देवराव होळी यांचे विधानसभा मतदार संघातील विविध बूथ केंद्रावर सदिच्छा भेट

0
561

‘मेरा बूथ सशक्त बूथ’ अभियान अंतर्गत आमदार डॉ देवराव होळी यांचे विधानसभा मतदार संघातील विविध बूथ केंद्रावर सदिच्छा भेट

चामोर्शी, सुखसागर झाडे २७ मार्च । तालुक्यातील गौरीपुर येथे आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी भारतीय जनता पक्षाचे वतीने सुरू करण्यात आलेल्या मेरा बूथ सशक्त बूथ अभियान अंतर्गत सदिच्छा भेट देऊन भारतीय जनता पक्षाचे वतीने स्थानिक बूथ वर भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध कामा संदर्भात मार्गदर्शन केले. स्थानिक गावात भाजप बूथ समिती चमू द्वारे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी समाज हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या राबवण्यात येणाऱ्या शेकडो विविध योजनांचा लाभ कसा देता येईल याकरिता कटिबद्ध राहण्याचे आव्हान केले व भारतीय जनता पक्षाचे विचार घराघरात कसे पोहचेल याकरिता अविरत काम करण्याचे निर्देश दिले व आपल्या स्थानिक ग्रामपंचायत येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा याकरिता माहिती व मार्गदर्शन केले.
त्याच प्रमाणे प्रत्येक बुथावरील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकत्र राहिले पाहिजे याकरिता सर्वांनी मिळून काम केल तर आपल्या बूथवर आपण कधीच मायनस होणार नाही असे प्रतिपादन केले यावेळी प्रामुख्याने येथील भारतीय जनता पक्षाचे ग्रामपंचायत सरपंच अशिम मुखर्जी उपसरपंच महानंद हलदार भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख भाजप बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा ,प्रतीक राठी व गौरिपुर येथील भारतीय जनता बूथ प्रमुख भवतोष मिस्त्री व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here