भारताचे भूतपूर्व पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृती दिना निमित्त मूल नगरीत अनेकांना मदतीचा हात 

0
465

भारताचे भूतपूर्व पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृती दिना निमित्त मूल नगरीत अनेकांना मदतीचा हात 

मुल, किरण घाटे – माहिती व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक,स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षण व १८ वर्ष वरील युवकांना मतदानाचा अधिकार प्राप्त करुन देणारे भारताचे यूवा पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचा स्मृतिदिन सदभावना दिन म्हणून साजरा करण्यात आला. स्थानिक तालुका कांग्रेस कमेटी कार्यालयात स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, संचालक अखिल गांगरेड्डीवार,राजेंद्र कन्नमवार, माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे, नगर सेवक विनोद कामडे, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, उपसरपंच राहुल मुरकुटे, यांचेसह तालुक्यातील व नगरातील कांग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्व.राजीव गांधी यांना पुष्पहार वाहून अभिवादन केले. याच दिना निमित्त मुल तालुक्यात वाघाने ठार केलेल्या मृतकांच्या नातेवाईकांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते कांतापेठ येथील मृतक कल्पना वाढई यांच्या मुलाला १०,०००/-रुपयाचा धनादेश देण्यांत आला. तसेच जानाळा येतील मृतक किर्तीराम कुलमेथे यांची पत्नी श्रीमती, विश्रांती कुलमेथे यांनाही १०,०००/-रुपयाचा धनादेश देण्यात आला. वसंत गेडाम यांची नातेवाईक कु.दिशा गेडाम यांना देखिल रावत यांचेहस्ते १०,०००/-चेक देण्यात आला. याप्रसंगी धनराज रामटेके, बापू मडावी उपस्थित होते. राजीव गांधी स्मृती प्रित्यर्थ कोरोना क्वारंटाईन सेंटर,अँटीजन तपासणी केंद्र,उपजिल्हा रुग्णालयात माक्स,सॅनिटायझर,हॅन्डक्लोज वाटप करण्यांत आले या शिवाय मूल नगरीतील नगर परिषदेच्या नवनिर्मित शाळेच्या भव्य व प्रशस्त इमारतीमध्ये असलेल्या संस्था विलगिकरन केंद्रात १०५ रुग्णांना माक्स, सॅनिटायझर, तसेच डॉक्टर, परिचारिका आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना हँडग्लोजचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना रुग्णांची अँटीजन तपासणी व आर.टी. पी.सी.आर. तपासणी करण्यांत आली पत्रकार भवनाच्या इमारतीमध्ये सुद्धा डॉक्टर,नर्स,कर्मचारी स्टाफ यांना माक्स, सॅनिटायझर,हॅन्डक्लोज वाटप करण्यात आले.तसेच उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पझिटिव्ह सेंटर मध्ये भरती असलेल्या रुग्णांना व त्यांची देखभाल , तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी यांना माक्स सॅनिटायझर बाटल्स, हॅन्डक्लोज पुरविण्यांत आले.हे साहित्य चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, संतोषसिंह रावत यांचे तर्फे उपरोक्त साहित्यांचा पुरवठा करण्यात आला असून साहित्य वाटपाचे काम कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार,संचालक अखिल गांगरेड्डीवार,युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवर,उपसरपंच राहुल मुरकुटे,नगर सेवक विनोद कामडे, व कांग्रेसचे कार्यकर्त्यांचे वतीने आज करण्यांत आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here