दर सोमवारी गोंडपिपरीची बाजारपेठ बंद राहणार उपविभागीय अधिका-यांचा निर्णय

0
337

दर सोमवारी गोंडपिपरीची बाजारपेठ बंद राहणार
उपविभागीय अधिका-यांचा निर्णय
गोंडपिपरी:-
जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत आहे.ग्रामीण भागातही हा प्रादुर्भाव पोहचू लागला आहे.खबरदारी म्हणून प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करित आहे.आता याचाच एक भाग म्हणून दर सोमवारी गोंडपिपरीची बाजारपेठ पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी संजीवकुमार ढवळे यांनी घेतला आहे.याबाबत एक आदेश काढून निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत आहे.या प्रादुर्भाव रोकण्यासाठी आरोग्य यंत्रणा व महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्नंाची पराकाष्ठा करित आहे.यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे.या कायदयानुसार उपविभागीय अधिका-यांना त्यांच्या क्षेत्रात नियेाजन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.यानुसार गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी संजीवकुमार ढवळे यांनी दर सोमवारी बाजारपेठ व सर्व प्रकारची आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.गोंडपिपरी नगर व ग्रामीण भागासाठी हा आदेश लागू असणार आहे.
केवळ अत्यावश्यक सेवा वगळता हा निर्णय सर्वासाठी बंधनकारक असणार आहे.31 आँगष्ट पर्यत या आदेशाचे पालन करून नागरिकांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन गोंडपिपरीच्या तहसिलदार सिमा गजभीये,
मुख्याधिकारी डाॅ.माधुरी सलामे,ठाणेदार संदीप धोबे यांनी केले आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here