बिबी येथे १४ बेडचे विलगीकरण कक्ष सज्ज

0
746

बिबी येथे १४ बेडचे विलगीकरण कक्ष सज्ज

ग्रामपंचायत व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा पुढाकार

कोरपना,नितेश शेंडे – जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे ग्रामपंचायत व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या सौजन्याने 14 बेडचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. कोरपना पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी बबन पाचपाटील व विस्तार अधिकारी (पंचायत) बैलनवार यांनी विलगीकरण कक्षाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत बिबीचे सरपंच मंगलदास गेडाम, उपसरपंच आशिष देरकर, ग्रामविकास अधिकारी ढेंगळे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल कुरसंगे, अनिल मारटकर, मारोती घोडाम, आनंद कनकुंटला, किसन कुळमेथे उपस्थित होते.
गावात बाधित झालेल्या कोरोना रुग्णाला या विलीनीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून त्यामुळे गाव सुरक्षित राहणार असल्याचे मत सरपंच मंगलदास गेडाम यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here