काेविड नियमाचे उल्लंघन – चंद्रपूर शहरात महसूल विभागाच्या पथकानी केल्या कारवायां!

0
576

काेविड नियमाचे उल्लंघन – चंद्रपूर शहरात महसूल विभागाच्या पथकानी केल्या कारवायां!

चंद्रपूर, किरण घाटे : आज बुधवार दि. १२ मे ला चंद्रपूर शहरातील व्यापा-यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांचेवर महसूल विभागाच्या एका पथकाने दंडात्मक कारवायां केल्याचे व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे दरम्यान शहरातील स्थानिक करण कोठारी ज्वेलर्स, कृष्णा ज्वेलर्स, कुवर टिकमचंद, एलिवेट रिअल इस्टेट, यांचेकडून अनुक्रमे १९००० रू. १५००० रू. २०००० रू. व १८००० रू. दंड वसूल करण्यात आला असल्याचे समजते. या शिवाय शहरात विना मास्क फिरणाऱ्या दोन व्यक्तींवर प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे एक हजार रुपये दंड वसुल करण्यांत आला असे एकंदर दंडापाेटी एकूण ७३००० रूपये खजिना दाखल करण्यांत आले असल्याचे कळते.उपराेक्त आजच्या सर्व कारवायां येथील उपविभागीय अधिकारी राेहन घुगे , चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, मंडळ अधिकारी रमेश आवारी, तलाठी वरभे, विशाल कुर्हेवार व पौर्णिमा बदखल यांनी केल्या महसुल विभाग पथकाच्या या कारवायांचे अनेकांनी स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here