पिपरी गावात साँनिटाँयझरचे वाटप

0
528

पिपरी गावात साँनिटाँयझरचे वाटप

काेरपना (चंद्रपूर), किरण घाटे : जगभरात पसरलेला महाभयानक काेराेना राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही पसरला आहे .शासन व प्रशासन काेराेनावर अंकुश लावण्यासाठी दिवस रात्र तारेवरची कसरत करीत असल्याचे बघावयास मिळत आहे .या संकटात लाेकप्रतिनिधी सुध्दा प्रशासनाला मदत करीत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभर दिसून येते .गावातील प्रत्येक व्यक्ती काेराेनापासून सुरक्षित राहावा या साठी प्रशासन आपल्या स्तरावरुन नागरिकांना वेळाेवेळी विनाकारण घराबाहेर पडु नका !स्वताची काळजी स्वता घ्या !असे आवाहन सातत्याने करीत आहे . काही अंशी का हाेईना ग्रामीण भागातील जनतेनी प्रशासमाच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला अाहे. राजूरा जिवती व काेरपना हे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुके असुन कोरपना तालुक्या अंतर्गत येणा-या पिपरी येथील एका छाेट्या गावात गावातील उपसरपंच ज्ञ्यानेश्वर तिखट यांनी काेराेनाचे संकट लक्षात घेता गावातील प्रत्येक नागरिकांना नुकतेच साँनिटाँयझरचे वाटप केल्याचे सारंग चांदेकर यांनी आमच्या प्रतिनिधीस काल सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here