शासकीय कार्यालयात अवैध मुरूमाचा वापर….. ठेकेदाराकडून गौण खनिजाची लूट……

0
406

शासकीय कार्यालयात अवैध मुरूमाचा वापर…..
ठेकेदाराकडून गौण खनिजाची लूट……

जवाहरलाल धोडरे
पोंभूर्णा प्रतिनिधी
पोंभूर्णा तालुक्यातील अनेक कामात अवैध रेती व मुरूमाचे वापर होत आहे. पावसाळ्यात नदी, नाल्याला पाणी असते.त्यामुळे डंपिंग केलेल्या मालाची बेभाव विक्री केली जात आहे. येथील एका शासकीय कार्यालयात बांधकाम सुरू असून बिना परवाना मुरुम सर्रास वापर करणे चालू आहे.
तहसीलदार व नायब तहसीलदार विलगीकरणात असून अवैध मुरूम उत्खनन जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित ठेकेदार मुरुम कामाची लिज न काढता सर्रास उत्खनन करित असून मेहेरनजर कुणाची असा प्रश्न पडला आहे. संबंधित ठेकेदार मुरुम कामात आपलीच मनमानी करित असून अशा उर्मट ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here