गडचांदूर येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शुभारंभ

0
658

गडचांदूर येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडचांदूर येथे कोविड 19 लसीकरणाला सुरुवात

गडचांदूर, प्रवीण मेश्राम : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गडचांदुर येथे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोविड-19 लसीकरणाचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी यांना योग्य खबरदारी घेवून आपल्या स्वतःच्या आरोग्याची तसेच लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची सुध्दा काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाच्या या संकटकाळात सर्वांनी शासन, प्रशासनाच्या सुचनांचे योग्य पालन करुन सहकार्य केल्यास आपण सर्व मिळून लवकरात लवकर कोरोनावर मात निश्चितपणे करू शकतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, उपनगराध्यक्ष शरदभाऊ जोगी, उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील टेंबे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी विशाखा शेडकी, जेष्ठ नेते अरुण निमजे, पाप्पया पोनमवार, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, संतोष मडाडोळे, पोलीस निरीक्षक गोपाल भारती, आरोग्य सभापती राहूल उमरे यासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here