अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून शेतकऱ्यांची प्रताडणा ; 20 वर्षांपासून नोकरीपासून वंचितच

0
388

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून शेतकऱ्यांची प्रताडणा ; 20 वर्षांपासून नोकरीपासून वंचितच

शेतकरी रवींद्र राघोबा जोगी यांनी कामगार राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडे विनंती अर्जातून मांडली व्यथा!!!

कोरपना 3 ऑगस्ट, ( अमोल राऊत ) : कोरपना तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी रवींद्र राघोबा जोगी यांची जमीन अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने 1987 मध्ये रेल्वे लाईनकरिता घेतली. त्याचा मोबदला म्हणून नोकरीचे आश्वासन सदर कंपनीकडून शेतकऱ्याला देण्यात आले. मात्र इतकी वर्षे लोटूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. आपली व्यथा सदर शेतकऱ्याने कामगार राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू यांना विनंती अर्जाद्वारे कळविली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सदर शेतकऱ्याची मौजा नांदा येथील। भूमापन क्रमांक 36 मधील 3 हेक्टर 63 आर पैकी 0.36 आर जमीन लॉरसन अँड टूब्रो कंपनी (L&T) अवाळपुरने रेल्वे लाईन करिता आवंटीत केली. तसे त्यांना लेखी प्रमाणपत्रही देण्यात आले. या जमिनीच्या मोबदल्यात या कंपनीकडून सदर शेतकऱ्याला नोकरीचे लेखी आश्वासन देण्यात आले. नंतर एल अँड टी कंपनीची विक्री होऊन अल्ट्राटेक झाली. 20 वर्षे एल अँड टी ने तर विक्री झाल्यापासू अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून शेतकऱ्याला फसवे अश्वासनच देण्यात आले. नोकरीची वाट पाहून 35 वर्षाचा कालावधी लोटला. मात्र अद्याप त्यांना कंपनीकडून नोकरी देण्यात आली नाही. “ऑल इज वेल” म्हणवणाऱ्या कंपनीकडून मात्र सदर शेतकऱ्याची फसगत करून प्रताडणा करण्यात आली आहे.
आजघडीला सदर शेतकऱ्याचे वय 50 वर्षे आहे. त्यामुळे माझ्या 22 वर्षीय मुलाला कंपनीने नोकरी देऊन समाविष्ट करून घ्यावे. मुलाचेही आयुष्य केवळ अश्वासनावर न राहता न्याय मिळवून द्यावा अशी विनंती सदर शेतकऱ्याने कामगार मंत्री यांना अर्जातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here