दुकाने सुरु ठेवणार गडचांदूर व्यापारी असोशियन चा निर्णय

0
764

दुकाने सुरु ठेवणार गडचांदूर व्यापारी असोशियन चा निर्णय

लॉकडाऊन बद्दल राज्यसरकार चा व्यापारी असोसिएशनने केला जाहीर निषेध

गडचांदूर, प्रवीण मेश्राम। कोरोना महामारीची दुसरी लाट झपाट्याने वाढत असून अनेक कोरोना रुग्णाचा मृत्यदर दिवसेंदिवस वाढतच आहे. याच हेतूला धरून आणखी एकदा राज्यसरकारने ६ एप्रिल पासून तर ३० एप्रिल पर्यन्त कडक लॉकडाऊन चा निर्णय घेतला. यामुळे संपूर्ण राज्यात व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात, तालुक्यात व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
लॉकडाउन मुळे छोटे व्यावसायिक पूर्णतः डबघाईला आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. गडचांदूर शहरातील व्यापारी असोशिएशनने व्यापाऱ्यांची छोटेखानी सभा घेऊन राज्यशासनाचा जाहीर निषेध केला. तर राज्यसरकार ने पूर्ण वेळ बंद न लावता काही तास व्यापाऱ्यांना दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात यावी, असे मत व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी व्यक्त केले. सर्व व्यापारी यांनी एकमताने दुकाने खुली करू जर आमच्या वर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, आम्ही तयार अहोत पण आम्ही दुकाने बंद करणार नाही अशी प्रतिक्रिया बघायला मिळाली. या नंतर अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने उघडण्यास सुरवात केली. या ठकाणी व्यापारी वर्गाचे पदाधिकारी हेमंत वैरागडे, धनु छाजेड, जुबेर रजा, काशिनाथ चुने, पंकज वैद्य, इशांत चौधरी , आशिष रोकडे दिनेश पत्तीवार सह शहरातील व्यापारी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here