गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे कुरखेडा येथे जनसंपर्क अभियान आढावा बैठक संपन्न

0
482

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे कुरखेडा येथे जनसंपर्क अभियान आढावा बैठक संपन्न

कुरखेडा (गडचिरोली), सुखसागर झाडे

तालुका काँग्रेस कमिटी कुरखेडा यांच्या वतीने आयोजित बुथ कमेटी तयार करण्यासंदर्भाची सभा दिनांक ११/ ०८/२०२१ रोज मंगळवारला डॉ.नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.

 

 

या सभेमध्ये समोर होणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक करीता प्रत्येक गाव खेड्यात जाऊन बुथ संघटन मजबूत करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे व काँग्रेस पक्षाला कुरखेडा तालुक्यात एक नंबरवर आणण्यासाठी कार्यकरत्यांनी कामाला लागावे. अशा सुचना डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी आपल्या मार्गदर्शनातून संबोधित केले.

 

 

सभेला जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष हसनअली गिलानी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकजभाऊ गुडेवार, कोषाध्यक्ष प्रभाकरजी वासेकर, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समीतीचे सदस्य जिवनभाऊ नाट, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे, जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी, जि.प.सदस्य प्रल्हाद कराडे, प.स. उपसभापती श्रीराम दुगा, प.स.माजी सभापती गिरीधर तीतराम, नगरपंचायतीच्या माजी अध्यक्ष आशाताई तुलावी, सिंधुताई तितीरमारे, सीडामताई, रोहित ढवळे, अरून उइके, मंगेश वालदे, प्रेमलाल सहारे, दिवाकर मारगाये, रौपभाई शेख, आळेजी, रुकसार शेख, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here