आर्णी तालुक्क्यातील हेटी ते दातोडी रस्त्याची अदोगती, प्रशासन मात्र निद्रिस्त

0
230

 

पायदळ चालणेही कठीणच

यवतमाळ जिल्हा
आर्णी तालुका

आर्णी तालुक्क्यातील हेटी ते दातोडी रस्त्याची अदोगती झाली आहे. मराठवाड्याची हद्द असलेली पैनगंगा नदीवरून रेती दातोडी, इचोरा, वरुड, हेटी या मार्गांनी जोमात नेली जात होती त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. इचोरा ते हेटी या गावातील प्रवास नागरिकांना पायदळ पार करावा लागत आहे. जेष्ठ नागरीकांना व गर्भवती महिलांना हा रस्ता काळजीचे कारण बनले आहे रुग्णाला अती तातडीने रुग्णालयात पोहोचवणे अशक्य होतं आहे. शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकानावरून खते, ओषधी आणतांना त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लेखी निवेदन देऊनही अद्याप नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. निद्रिस्त शासनाच्या विरोधात व सुव्यवस्थेच्या मुद्यावर जनतेतून रोष व्यक्त होत आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here