काव्यवाचनाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता

0
478

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
जिल्हा वर्धा

काव्यवाचनाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता

‘माझ्या मराठीचा बोलू कौतुके’ असे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी ज्या भाषेचा महिमा वर्णन केला आहे अशा मराठी भाषा संवर्धनाबाबत मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारोपीय कार्यक्रमात विचारमंथन झाले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा सपना जयस्वाल रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा अभय दांडेकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात आद्याशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली प्रसंगी प्रा अजय बिरे यांनी मराठी भाषेचे स्थान व महत्त्व प्रतिपादन केले व मराठी भाषिकांनी प्रत्यक्ष जीवनात मातृभाषेचा वापर अधिकाधिक करण्याची गरज त्यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केली, प्रा सपना जयस्वाल यांनी मराठी भाषा लवचिक असून तिची गोडी अवीट आहे असे मत व्यक्त केले, प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी मराठी ही प्रत्येकाची जीवन व्यवहाराची भाषा व्हावी, प्रत्येकानी आपल्या मुलांना इंग्रजी हिंदी सोबत मराठी भाषा सुध्दा लिहिता वाचता येईल याकडे लक्ष द्यावे असे आग्रहपूर्वक प्रतिपादन केले, जे न देखे रवी ते देखे कवी या ओळींच्या संदर्भाने कवी व साहित्यिकांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी काव्यवाचन कार्यक्रम घेण्यात आला प्रा अभय दांडेकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात सर्वांच्या अंतःकरणाला पिळ घालणारी, बापाचे महत्त्व सांगणारी ‘बाप’ ही कविता सादर केली, प्रा पूनम बुरीले यांनी कोरोणा या कवितेतून कोरोनाचा प्रताप सार्थ शब्दात मांडला तर प्रा भाग्यश्री साबळे यांनी अस्तित्व या कवितेतून मानवी अस्तित्वाची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भाग्यश्री साबळे यांनी तर आभार प्रा आशा घाटे यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाला कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here