राष्ट्रीय महामार्ग अधिनियम नुसार शेतकऱ्यांना भूसंपदीत मोबदला मिळण्यात यावे .. एकनाथ थुटे यांनी केली मागणी

0
334

यवतमाळ जिल्ह्यात चौरस मीटर ने मिळतो मोबदला तर चंद्रपूर जिल्ह्यात का मिळत नाही मोबदला ?

चिमूर

चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम सुरू असून या मार्गावरील शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग अधिनियम नुसार मोबदला मिळत नसून भेदभाव होत असल्याचा निदर्शनास येत आहे .यवतमाळ जिल्ह्यात चौरस मीटर ने मोबदला मिळाले असताना चंद्रपूर जिल्ह्यातील बोथली( वहानगाव ) येथील शेतकऱ्यांना चौरस मीटर ने मिळणार नसल्याने याची दखल एकनाथ थुटे यांनी घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने राष्ट्रीय महामार्ग अधिनियम नुसार चौरस मीटर ने शेतीचा मोबदला देण्याची मागणी पत्रकार परिषद मधून केली .
शिंदे मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद मधुन एकनाथ थुटे यांनी सविस्तर माहिती सांगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने चौरस मीटर प्रमाणे मापदंड मोबदला देण्याची मागणी केली उमरेड भिसी चिमूर भिसी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे या मार्गावरील बोथली (वहानगाव) येथील एकनाथ थुटे व सदानंद थुटे यांची 5 एकर शेती ही प्रोजेक्ट्स करण्यासाठी नियोजित केली असताना त्या जमिनीची मोजमाप हायवे कंपनीच्या माध्यमातून सुद्धा करण्यात आले परंतु अधिनियम नुसार प्रकिया सुद्धा न राबविता दैनिकात जाहिरात देणे,आक्षेप ची संधी देणे अश्या आदी बाबी वर चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आले नसल्याचे सांगत एकनाथ थुटे पुढे बोलले की यवतमाळ जिल्ह्यातील वणी राष्ट्रीय महामार्ग च्या अंतर्गत गेलेल्या शेतकऱ्यांना चौरस मिटर ने मोबदला दिल्याचे पुरावे देत नायगाव खु येथील पुरावे सांगितले . यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिनियम १९५६ नुसार शेतकऱ्यांना चौरस मीटर ने मोबदला मिळत असताना चंद्रपूर जिल्हा प्रशासन सरसकट हेकटरी कसा काय देतो असा गंभीर प्रश्न एकनाथ थुटे यांनी केला

वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केला असताना मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही .केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार खासदार अशोक नेते यांना सुद्धा पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता तसेच विधानसभा उपाध्यक्ष नाना पटोले व आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना सुद्धा पाठपुरावा केला होता .आमदार बंटीभाऊ
भांगडिया यांनी सुद्धा जिल्हाधिकारी यांना पाठपुरावा करून चौरस मीटर ने मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केले .लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून पाठपुरावा करीत असताना मात्र जिल्हाधिकारी यांनी केवळ आश्वासन देत असल्याचे सुद्धा सांगण्यात आले .
अधिनियम १९५६ च्या नियमानुसार शेती मोबदला देण्याची मागणी एकनाथ थुटे यांनी पत्रकार परिषद मधून केली
या पत्रकार परिषद ला रमेश कराळे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here