राजमाता जिजाऊ यांची जयंती मूल मध्ये उत्साहात साजरी !

0
460

राजमाता जिजाऊ यांची जयंती मूल मध्ये उत्साहात साजरी !

🛑🟪चंद्रपुर 🛑☀️🌀किरण घाटे🟩🟪⭕ बौद्ध विकास मंडळ मूल, (विहीरगाव )आणि शिवशाही मित्र परिवार व्दारे राजमाता जिजाऊ यांची जयंती मूल (विहीरगांव)येथे नुकतीच साजरी करण्यांत आली 🛑🌼🌀 यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस दिपप्रज्वलित व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.🛑🛑🌀🌼 निखिल वाढई हे आपले मनाेगत व्यक्त करतांना म्हणाले की माता ही केवळ प्रेमळ नसून एका मोठ्या शक्तीचा प्रतिबिंब आहे यांचे जिवंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. !त्यांचा संस्काराने शत्रूच्या स्त्रीला बहीण म्हणून सन्मान देणारा एकमेव रयतेचाराजा छत्रपती शिवाजी महाराज घडले. 🛑🌼🟪🟣🌀आकाश येसनकर यांनी म्हटले की छत्रपती जन्माला येण्यासाठी, आधी जिजाऊ घडवाव्या लागतात.. !जगात अनेक राण्या झाल्या , महाराण्या झाल्या पण जिजाऊंसारखी राजमाता दुसरी झाली नाही .
आपल्या पतीचं स्वराज्याचं स्वप्न तीने पुत्र शिवबाच्या मनात पेरलं.! 🛑🌼🟪🟢🌀 प्रणित पाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की राजमाता जिजाऊ म्हणजे शिवबांचे ज्ञानपीठ , शिवबाचे विद्यापीठ , राजमाता जिजाऊ यांच्या परिचयासाठी पती , पुत्र वा नातवाच्या ओळखीच्या पुस्तीची गरज नाही ! . राजमाता जिजाऊ म्हटलं की पुरे !
नुसतं राजमाता म्हटलं तरी ओठांवर आपसूकच जिजाऊ शब्द येतो .🌼🛑🟪🟢🟡🔷कार्यक्रमाचे संचालन दिलीप भाऊ गेडाम यांनी केले.तर आभार प्रमोद गेडाम यांनी मानले, ☀️🌼☀️ कार्यक्रम यशस्वीते साठी शम्मीभाऊ डोर्लीकर यांनी अथक प्रयत्न केले.🟡🟢🛑🔷उपरोक्त कार्यक्रमाला रोहित शेंडे, सुधीर वाडगुरे,सौरभ वाढई,सुरज गेडाम निहाल गेडाम, हर्षल भुरसे, सोहन दहिलकर, चेतन दहिवले,प्रणय रायपुरे, साहिल खोब्रागडे,निरज डोर्लीकर,आनंद येसनकर,सायक खोब्रागडे, प्रथम गेडाम, तुषार घ्यार, अक्षय दुमावार, करण डोर्लीकर,तसेच मित्र परिवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here