यंग चांदा ब्रिगेडच्या मुख्य संघटिका वंदना हातगांवकरला जळगावच्या सेवक सेवाभावी संस्थेचा महाराष्ट्र गाैरव पुरस्कार बहाल!

0
491

यंग चांदा ब्रिगेडच्या मुख्य संघटिका वंदना हातगांवकरला जळगावच्या सेवक सेवाभावी संस्थेचा महाराष्ट्र गाैरव पुरस्कार बहाल!

आमदार किशाेर जाेरगेवारांनी केले त्यांचे अभिनंदन!

चंद्रपूर । किरण घाटे

सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रकमी असणां-या चंद्रपूरातील सुपरिचीत व प्रख्यात यंग चांदा ब्रिगेडच्या मुख्य संघटिका वंदना हातगांवकर यांना त्यांचे सामाजिक कार्यातील उल्लेखनीय व अमुल्य कामगिरी बाबत जळगांवच्या सेवक सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र गाैरव पुरस्कार व सन्मान पत्र नुकतेच बहाल करण्यांत आले आहे .
दरम्यान चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष विद्यमान आमदार तथा यंग चांदा ब्रिगेडचे सर्वेसर्वा किशाेर जाेरगेवार यांनी एका संदेशातुन वंदना हातगांवकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहे .
स्थानिक बाबूपेठ निवासी हातगांवकर या उच्च शिक्षित असुन त्यांना सामाजिक कार्याची गेल्या ब-याच वर्षापासुन विशेष रुची व आवड आहे .यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमांतुन त्यांनी आज पावेताे चंद्रपूरात अनेक महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले .महिलादिनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणां-या महिलांचा सत्कार तसेच महाविद्यालयीन व शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार साेहळे (या पुर्वि )शहरात आयोजित केले आहे .
वंदना हातगांवकर यांना महाराष्ट्र गाैरव पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे , कविता चाफले , ज्याेति मेहरकुरे , सराेज हिवरे , पूनम रामटेके , प्रांजली दुधे , सुविधा चांदेकर , प्रतीक्षा झाडे , विमल काटकर , वैशाली रामटेके , प्रतिभा नंदेश्वर , सुवर्णा कुळमेथे , रजनी रणदिवे , दुर्गा वैरागडे , संजीवनी धांडे , रक्षा नगराळे , क्रूतिका साेनटक्के , कल्याणी सराेदे , अर्चना सुतार , रविना डेकाटे , निता बाेरीकर , रुपाली संताेषवार , ललिता फुलझेले , अर्चना चावरे , कुसुम अलाम , अरुणा गावुत्रे , प्रविणा पाेहनकर , लता निंदेकर , भावना खाेब्रागडे , मयुरी समर्थ आदिंनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here