आर्वी परिसरात कोंबडाबाजार व जुगारअड्डा जोमात : पोलीस प्रशासन कोमात

0
657

आर्वी परिसरात कोंबडाबाजार व जुगारअड्डा जोमात : पोलीस प्रशासन कोमात

राजुरा । अमोल राऊत : तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आर्वी येथे कोंबडाबाजार व जुगारअड्डा सर्रासपणे जोमात सुरू आहे. परिसरात दारू तस्करी, रेती तस्करी व कोळसा तस्करी सह अवैध धंदे जोमात सुरू असून पोलीस प्रशासन कोमात असल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.
शेतशिवारात कोंबडाबाजार भरवला जातो. यावर जुगाराचाही खेळ मांडण्यात येतो. याठिकाणी हवसे, गवसे, नवसे येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय वरदहस्त व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मिलीभगतपणामुळे यावर कोणतीच कारवाई होत नसल्याची चर्चा सामान्य जनतेत सुरू आहे. बिनभोभटपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर कोंबडाबाजारावर पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. राजकीय वरदहस्त व्यक्ती व काही हप्तेखोर पोलीस कर्मचाऱ्यांच्या लोभापायी यावर पडदा टाकण्यात येत असल्याची माहिती आहे.
यामुळे बरीच कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाईल याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here