अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन तर्फे स्वयंसेवा महिला बचत गटाना मार्गदर्शन व सहाय्य

0
415

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन तर्फे स्वयंसेवा महिला बचत गटाना मार्गदर्शन व सहाय्य

आवाळपूर / प्रतिनिधी

सातत्याने जनहिताचे कार्य करणाऱ्या व कमजोर कळीला पकडून त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन व मदत करणाऱ्या अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनने या वेळेस आपल्या कार्याची एक वेगळीच अनुभूती जगासमोर आणली आहे.

नजीकच्या गावातील महिला बचत गटाचा शोध घेऊन योग्य मार्गदर्शन करून त्याचा मान व आत्मविश्वास उंचावला आहे. गावातील क्रिष्णा महिला बचत गट सांगोळा, धनलक्ष्मी बचत गट बीबी, महालक्ष्मी बचत गट नांदा, वीरांगणा स्वयं सहायता बचत गट नांदा यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले व त्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना केल्यात.

या बचत गटामार्फत वेगवेगळे साहित्य व दैनंदीन जीवनात उपयुक्त असणाऱ्या वस्तू व पदार्थ बनविल्या जातात त्यामध्ये कापडी बँगस्, सुवासिक अगरबत्ती, धूप अगरबत्ती, निरमा, फिनाईल, चायपत्ती, भांडे साफ करण्याचे लिक्विड, मिरची पावडर, हलदी पावडर, बांबू पासून बनविलेल्या विविध वस्तू व सध्याच्या काळात कोरोनाला टाळण्यासाठी उपयुक्त असणारे मास्क यांचा त्यांना विकण्याकरिता त्यांच्याकडे योग्य पर्याय नव्हता तेव्हा अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनने पुढाकार घेऊन त्या वस्तू अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या आवारातील को-आँपरेटीव्ह सोसायटी मध्ये ठेवण्याची अनुमती दिली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “We supports Vocal for Local”
या योजनेला अनुसरून त्यांची विक्री वाढावी व त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी त्यांचा प्रचार जाहिरात, बँनर्स व व्यक्तीगत या माध्यमातून सुरू केला आहे.

याच प्रयत्नांना यश मिळून गेल्या पाच महिन्यात त्यांची विक्री जवळपास एक लाख सहा हजारापर्यंत झाली आहे. व सर्व महिलांचा आत्मविश्वास नव्याने जागून उठला आहे त्या सर्वांनी अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनचे आभार मनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here