विमुक्त भटक्या जमाती ची राष्ट्रीय ऑनलाईन परिषद संपन्न…

0
428

विमुक्त भटक्या जमाती ची राष्ट्रीय
ऑनलाईन परिषद संपन्न…

इदाते आयोगाचे,रोहिणी आयोगाचे पूर्ण शिफारशी लागू करा…..! अस सर्वांचा एकच सुर…

चंद्रपूर दिनांक 28 सप्टेंबर : अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघ दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश शाखा द्वारे विमुक्त जाती भटक्या जमाती साजाचे केंद्र सरकार कडे प्रलंबित दादासाहेब इदाते आयोगाचे शिफारशी पूर्णपणे लागू करण्यासाठी, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, श्री. आनंदराव अंगलवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष व समस्त पदाधिकारी यांनी आयोजन केलेले राष्ट्रीय परिषदेत सामाजिक आरक्षण संरक्षण, विमुक्त भटक्या जमाती दशा व दिशा या विषयावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊन प्रश्न सरकार दरबारी निवेदन सादर करणे आवश्यक आहे ठरवून सदर परिषद आयोजन केले. सदर राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षथानी श्री. रवींद्र कुमार राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघ दिल्ली व उद्घाटन श्री. हरिभाऊ राठोड, राष्ट्रीय नेते डी.एन. टी.आणि ओबीसी. महाराष्ट्र, तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री. मान. विषवंबर प्रसाद निषाद संसद सदस्य राज्य सभा, उत्तेरप्रदेश, नानक सिंह चव्हाण राजस्थान, मारी मुत्थी तामिळनाडू, नरेंद्र भाई तेलंगणा, चंद्रशेखर सिसोदिया मध्यप्रदेश, डॉ. राणु छारी ग्वाल्हेर ऊ.प्रदेश, दिलीप भाई गुजरात, सविता नटराज बिहार, इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत प्रस्तविकेतून श्री आनंदराव अंगलवार यांनी विमुक्त भटक्या समाजाचे महाराष्ट्रात व देशाच्या विकासासाठी सन 1757, 1857 ते 1947 पर्यंत देशाचे स्वतंत्र लढ्यात, राजा महारजांचे काळात कील्ह्याचे संरक्षण, गुप्तचर विभागात काम, कारागीर, कलाकारी, नृत्य, संगीत, संस्कृति संवर्धन व संरक्षण मनोरंजन, शेतीला आवश्यक अवजार निर्मती किल्ले, दरबार, ऐतिहािकदृष्ट्या मंदिरे बांधकाम, जंगली प्राणी पालन, पोषण, पशुपालन बुरुज बांधकाम इत्यादी अनेक क्षेत्रात हिरहिरिने भाग घेऊन देश विकासात योगदान देणाऱ्या समाजाला इंग्रजांनी 1871मध्ये क्रिमिनल अॅक्ट तयार करून या जमातींना गुन्हेगारीचा शिक्कमोर्तब करून गावकुसाबाहेर, जंगलाचे शेजारी राहण्यास प्रतिबद्द केले, कालांतराने हा समाज भटकंती करून उदरनिर्वाह करू लागले, जेंव्हा. सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले तेंव्हा या जमातींना विविध जातींना विविध राज्यात विध प्रवर्गात समावेश करून गोंधळ निर्माण केले. तेंव्हा एकच जात विविध प्रवर्गात न ठेवता एक जात एक प्रवर्ग असायला पाहिजे ,या जातींना एस. सी. एस. टी. प्रमाणे संपूर्ण देशात एकसमान सामाजिक आरक्षण लागू होणे काळाची गरज आहे असे सांगून यासाठी देशपातळीवर आंदोलनाची गरज असून संपूर्ण विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गाच्या नेत्यांनी, कार्यकर्ते व विविध संघटनेतील पदाधिकारी एकसंघ होऊन सरकारकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे असे आपले मनोगत व्यक्त करून या समाजाचे विकासासाठी नेमलेले विविध आयोगाचे शिफारशी सरकार दरबारी प्रलंबित असून ते पूर्णपणे लागू करून घेण्यास मोठ्याप्रमाणात संघटित होणे आवश्यक आहे तेंव्हाच सरकारचे लक्ष वेधले जहील असे म्हणाले. उद्घानप्रसंगी श्री. हरिभाऊ राठोड, यांनी मागील 15 वर्षापासून या समाजासाठी सतत झटत आहेत, ते स्वतः एक प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत व मागील सर्व आयोग, दादा इदाते आयोगाचे शिफारशी सह रोहिणी आयोगाचे शिफारशी लक्षात घेऊन सरकारने या समाजाला न्याय द्यावे, वेळप्रसंगी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन करावे लागल्यास समाजबांधव तयार राहावे असे आवाहन केले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री विषवंबर प्रसाद निषाद खासदार राजसभा उत्तेरप्रदेश यांनी आपण ज्या पक्षात काम करतो त्या त्यापक्षातील नेतृत्वात पक्ष श्रेष्ठींना लक्षात आणून संसदेत मुद्दा उचलण्यास निवेदने द्यावे ,ते स्वतः राज्यसभेत हा मूद्दा उचलून धरणार व राष्ट्रीय आंदोलनात सक्रीय सहभाग घेणार ,विविध सामाजिक संघटना एकत्रयेण्यासाठी आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणातून श्री. रवींद्र कुमार यांनी. सरकारवर जोरदार टीका केली की हे सरकार गरिबांचे हिताचे निर्णय घेण्यात दिरंगाई करत असून झोपल्याचे साँग घेत आहे. राष्ट्र स्तरावर आंदोलन सुरू करून सरकारचे कानाखाली आवाज करावे लागणार तेंव्हा समस्त समाज बांधव तयार राहावे, सरकारद्वारे काही लोकांना आर्थिक महामंडळ रूपी गाजर देऊन आवाज दाबण्याचे षडयंत्र रचून समाजाला विकत घेण्याचे आव आणतात अशा राजकीय पक्षांपासून सावध, दूर राहावे . वापले समाजासाठी काम करणारे पक्षांना जवळ करावे असे प्रतिपादन केले. सर्वच वक्ते यांनी दाद ईदाते आयोगाचे व justice Rohini आयोगाचे शिफारशी लागू करावे असे सुर प्रतेकांचे भाषणातून दिसून आले व एकमताने ठराव मंजूर करण्यात आले .नानकसिंह चव्हाण ,मंगेश सोलंकी, डी.सी.राठोड, नामा जाधव, डॉ. रानू च्छारि, अमरसिंह भेडकुट सविता नटराज, श्री.देवकर, धनराज चौके, पप्पू मदारी, चरणदास बावणे, चंद्रशेखर kotewar, चरणदास बैरागी/वैष्णव, इत्यादिनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. प्रीती तोटावार यांनी उत्तम संचलन केले वकऱ्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री रोहिदास पवार महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष यांनी केले या प्रसंगी देशातील एकूण सतरा राज्यातील प्रतिनिधी या ऑनलाईन परिषदेला, उपस्थित होते सर्वांनी आत्तिउत्तम्म ऑनलाईन चर्चा सत्र आयोजन केल्याबद्दल आनंदराव अंगलवार सहित सर्व आयोजन समिती महाराष्ट्र कार्यकारिणीचे अभिंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here