विरूर ठाण्यात शांतता बैठक संपन्न… शांतता बैठकीत ठाणेदारांनी केली उपस्थित सदस्याना शांततेचे आव्हान
अविनाश रामटेके
विरूर स्टेशन
सद्याच्या राजकीय वातावरणात अनेक तथाकथित नेते समाजात फूट पाडणाऱ्या वक्तव्यांना प्राधान्य देताना दिसत आहेत. लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून केवळ भूतकाळ उकरून काढण्याचा हा प्रयत्न सरकारच्या अपयशावरच प्रकाश टाकतो.
नागपूरसारख्या शांत शहरालाही याचा फटका बसतो आहे, हे निश्चितच चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे, जेणेकरून सामाजिक सलोखा अबाधित राहील. विरूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार संतोष वाकडे यांनी आज विरूर ठाण्यात घेतलेल्या शांतता बैठकीतून त्यांनी दिलेले आवाहन हे शांतता अबाधित करिता एक उत्तम प्रकारे पाऊल म्हणता येईल,
कारण यावेळी प्रथमच शांतता बैठक समिती चे सदस्य सह इतरांना बैठकीत बोलावून आगामी होणाऱ्या रमजान ईद ,गुडी पाडवा ,रामनवमी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यानें एकोप्याने सर्व सण व मिरवणूक साजरे करा असे यावेळी उपस्थितांना आव्हान केले.
यावेळी विरूर परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.