एकरभर कपाशी,डुकराने केली उध्वस्त ; शेतकरी आला रडकुंडीला

0
573

एकरभर कपाशी,डुकराने केली उध्वस्त ; शेतकरी आला रडकुंडीला

बोथली (गजानन उमरे) : चीमूर तालुक्यातील बोथली परीसरात रानडुकराने हैदोस घातला आहे.ताडोबा जंगल जवळ असल्याने नेहमीच वन्यप्राण्याचा उपद्रव असतो. येथील शेतकरी योगेश्वर वासुदेव चामचोर यांची एक एकरातील कपाशी डुकराने पुर्णपणे उध्वस्त केली आहे.विशेष म्हणजे यांचे शेत बोथली येथील वनविभाग कार्यालयाच्या लगत आहे.परीसरातील शेतकरी रडकुंडीला आलेआहे.
यावर्षी परीसरात अत्यल्प पाऊस झाल्याने धानाची रोवणी झाली नाही.सोयाबीन पीकावर विवीध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ,हातचे पीक गेले.त्यामुळे आता सगळी मदार कपाशीवर होती,मात्र ऐन वेचणीच्या हंगामात डुकराने कपाशी उध्वस्त केल्याने.आता समोर कशाच्या भरोश्यावर जगायचं? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.

दरवर्षीच वन्यप्राण्यांचा उपद्रव आम्हाला सहन करावा लागतो. हातावरच्या फोड्याप्रमाणे जपलेलं पीक जेव्हा वन्यप्राणी उध्वस्त करतात, तेव्हा आमच्यावर काय बितत असेल, ते आम्हचं आम्हालाचं माहीतं, तेव्हा आम्हाला तुटपुंजी मदत न देता शेतीला कुंपण करण्याकरीता मदत करावी. कींवा आमच्या जमीनी वनविभागाने विकत घेऊन आम्हाला मोकळ करावं, हेही नसलं होत तरं आम्हाला आत्महत्या करायची परवानगी द्यावी. बसं झालं आता कीती सहन करणार. – योगेश्वर चामचोर
पीडीत शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here