तालुकाअध्यक्ष कवडू कुंदावारांना पदावरून हटवा : अन्यथा सामुहिक राजीनामे देऊं 

0
848

तालुकाअध्यक्ष कवडू कुंदावारांना पदावरून हटवा : अन्यथा सामुहिक राजीनामे देऊं 

स्नेहभोजन कार्यक्रमात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्धार 

पोंभूर्णा प्रतिनिधी

गेल्या २५-३० वर्षापासून पोंभूर्णा तालुक्यात भाजपा चा बोलबाला आहे. आजही ते वर्चस्व कायम आबाधित आहे. आपशी मतभेद व गटा-तटात विखुरलेले दिशाहीन काॅन्ग्रेस कार्यकर्ते हे या मागील प्रमुख कारण असू शकते. पन, आजही तालुका काॅन्ग्रेस मधील बंडाळी चे वादळ शमता शमेनासे झाले आहे. राज्यात काॅन्ग्रेस सत्तेत सहभागी आहे. जिल्ह्यात खासदार काॅन्ग्रेसचा आहे, शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री पद ही काॅन्ग्रेस ला लाभलेले लाभले आहे. ही सगळी अनुकूल परिस्थिती पाहता पोंभूर्णा तालुका काॅन्ग्रेस ला बळकटी येईल असे वाटत असतांना तालुका काॅन्ग्रेस मधील दुफळी संपता संपेनासी होत चालली आहे. इथली काॅन्ग्रेस आजही विपरीत परिणामाचा सामना करीत असल्याचे दिसते. गटबाजी संपेल असे वाटत असतांना ती आणखीनच बळकट होत चालली असल्याचे एकंदरीत वातावरण तयार होत चालले असुन पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी ही काॅन्ग्रेसला धोक्याची घंटा ठरणार असल्याचे दिसत आहे.

१ नोव्हेंबर रोजी असंतुष्ट पन, काॅन्ग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते समजणाऱ्या काॅन्ग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहभोजन कार्यक्रम चेक नवेगांव येथे जेष्ट कार्यकर्ते वसंत मोरे यांच्या शेतात पार पडला. कार्यक्रमाला जवळपास दोनशे ते अडिचशे कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. यात नगरसेवक, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झाल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमात उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांकडून ‘ कुंदावार हटाव, काॅन्ग्रेस बचाव ‘ ची वज्रमुठ बांधण्यात आल्याचे समजते. तसेही कुंदावार च्या तालुकाअध्यक्ष निवडीपासूनच ही ठिणगी पडल्याचे दिसत होते. लोकसभा, विधानसभेच्या निवडणूकीत ही दुफळी एकोप्यात रूपांतरीत झाल्याचे दिसले होते, पन ती वादळापूर्वीची शांतता असल्याचे आता सिद्ध होत आहे. त्या ठिणगीचे रूपांतर आता वणव्यात होऊं पाहत आहे.

काॅन्ग्रेस ही विचारधारा असल्याने आम्ही अगदी सुरूवातीपासूनच काॅन्ग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहीलो, तालुक्यात काॅन्ग्रेस वाढीसाठी योगदान दिले, परंतु कवडू कुंदावारांनी तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्या नंतर मागील एक वर्षापासून पक्षाचे ध्येय धोरण बाजूला ठेवून, निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच वाऱ्यावर सोडून पक्ष संगठन खिळखिळे करीत असल्याचा आरोप कुंदावारवर ठेवण्यात येत आहे. त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी ही संधीसाधूपनाची असुन,मागील २० वर्षापासून त्यांनी स्वतःचेच हीत जपत आल्याचा गंभीर आरोप कुंदावारवर ठेवण्यात आला आहे. आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला दगा देत आल्याचा ठपका सुध्दा कुंदावारवर ठेवण्यात आला आहे. दगाफटका करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तीला पक्षाने अध्यक्षपद बहाल केल्याने तालुक्यात काॅन्ग्रेसला फार मोठे नुकसान सोसावे लागत असल्याचे या कार्यकर्त्यांचे स्पष्ट म्हणने असुन भविष्यातही पक्षाला याची मोठ्ठी किंमत मोजावी लागणार असल्याची भिती या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढील वर्षीच्या मार्च एप्रिल महिण्यात नगर पंचायत, ग्राम पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची दाट संभावना असुन,या निवणूकात याचे परिणाम भोगावे लागणार असल्याची भिती व्यक्त करीत ‘ कुंदावार हटाव, काॅन्ग्रेस बचाव ‘ हा एकच पर्याय असल्याचे सांगत १ नोव्हेंबरच्या स्नेहभोजन कार्यक्रमातील चर्चेला पूर्णविराम देण्यात आला. याही व्यतिरिक्त कुंदावार अध्यक्ष असलेल्या काळात पक्षाचे अस्तित्व लयास जात असल्याने त्यांना अध्यक्ष पदावरून त्वरीत दुर करावे, अन्यथा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच पदावर राहीलेले पदाधिकारी काॅन्ग्रेस पक्षाशी फारकत घेतील असा गर्भित इशारा देण्यात आला आहे.

सक्रिय राजकारणात न रमलेल्या कुंदावारांना सुरूवातीला सूया टोचल्याचा त्रास झाला असेल परंतु आता घणाचे घांव सोसावे लागत आहेत. सुरूवातीला राजीनामा अस्त्राचा वापर केला होता, पन तो प्रसंग कसाबसा निभावला परंतु स्नेहभोजनाच्या निमित्ताने पुढे आलेला हा प्रसंग कुंदावारांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखविणारा हा मोठ्ठा प्रसंग असल्याने तालुका काॅन्ग्रेस मधील राजकारण ढवळून निघणार आहे. त्यामुळे कुंदावारांना अध्यक्ष पदावरून त्वरीत हटविण्यात यावे अशी मागणी जेष्ट कार्यकर्ते वसंत मोरे, नगरसेवक ओमेश्वर पद्मगिरीवार, नगरसेवक अमरसिंह बघेल, अशोक गेडाम, मुर्लिधर टेकाम, राजेंद्र बोलमवार, सुनील कुंदोजवार, इत्यादींनी संयुक्त स्वाक्षरीनिशी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here