कोरोना जनजागृती काव्यधारा – ९

0
650

कोरोना जनजागृती काव्यधारा – ९

कवी – नरेंद्र कन्नाके, आनंदवन

कविता/अभंग : माझेच कुटुंब

 

आई – बाबा,मुले, सदा सहवास l
आनंदाचा श्वास,कुटुंबात ll

येता सुख-दुःख,तजवीज करू l
विचारांना स्मरू, नित्य नेमे ll

सदृढ शरीर, करावा व्यायाम l
योग प्राणायाम, स्वास्थ्यासाठी ll

उभ्या आयुष्यात, संकटे अनेक l
राहू सारे नेक, संगतीने ll

विषाणू कोरोना, हाहाकार केला l
शेजारचा मेला, संसर्गाने ll

जिकडे – तिकडे, भयावह स्थिती l
कोरोनाची भिती, सकलांना ll

लावा मुखी मास्क, नको आलिंगन l
पाळावे बंधन, सुरक्षित ll

कोविड चाचणी, सारेच करावे l
लोकांना सांगावे, घरोघरी ll

स्वच्छतेचा वसा, प्रत्येकाने घेऊ l
संस्कार रुजवू, गावोगावी ll

यावर उपाय, उद्बोधन करू l
अविरत सुरू, ज्ञानार्जन ll

माझेच कुटुंब, माझेच कर्तव्य l
माझे भवितव्य, माझे हाती ll

 

कवी : नरेन्द्र गुरुदास कन्नाके
म.राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित
आनंदवन, वरोरा
संपर्क – ९८२२४६४५९७

 

(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)

•••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here