हिंगणघाट शहरातील खाजगी शाळांनी ट्यूशन फी व्यतिरिक्त कोणतीही फी घेण्यात येऊ नये

0
435

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी 9850833516

हिंगणघाट शहरातील खाजगी शाळांनी ट्यूशन फी व्यतिरिक्त कोणतीही फी घेण्यात येऊ नये तसेच भारतीय विद्या भवन शाळेने आरटीई प्रवेश अंतर्गत तीन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्या बाबत व भारतीय विद्या भवन शाळा शासकीय आदेशाची पायमल्ली करणेबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या उपस्थितीत जागृत पालक समिती,हिंगणघाटचे पदाधिकारी सौ.शुभांगी डोंगरे,नगरसेवक सुरेश मुंजेवार,गजू कुबडे ज्वलंत मून इत्यादीच्या वतीने हिंगणघाट येथे पालकमंत्री सुनील केदार आले असताना निवेदन देण्यात आले.
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे व जागृत पालक समिती यांच्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की हिंगणघाट शहर ही कामगार नगरी असून कोविड-१९ जागतिक महामारी असून मोठ्या प्रमाणात जनता बेरोजगार झाली आहे. अशा परिस्थितीत घर कुटुंब चालविणे देखील कठीण झाले आहे ही बाब लक्षात घेऊन शहरातील काही शाळा पालकांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचा सपाटा लावला आहे. तरी आपण आपल्या स्तरावर शहरातील शाळा व्यवस्थापनाला आदेश देऊन ट्यूशन फी व्यतिरिक्त कोणतीही फी घेण्यात येऊ नये असे आदेश देण्यात यावे.
तसेच भारतीय विद्या भवन या शाळेत तीन विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत राखीव मोफत प्रवेश मिळाला आहे परंतु भवन्सच्या व्यवस्थापनाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील २५% विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत शाळेतील मोफत शिक्षण देण्याची प्रवेश प्रक्रिया नाकारली आहे. शाळेतील प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण घेणार नाही असे लेखी संमती पत्र बळजबरीने लिहून घेतल्या जाते याप्रकरणी शाळेवर योग्य कारवाई करून पालकांना न्याय द्यावा.
भारतीय विद्या भवन्स शाळा व्यवस्थापन शासकीय आदेशाची वेळोवेळी पायमल्ली करून देखील शाळेवर कोणतीही कारवाई होत नाही. उदाहरणार्थ शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणे, पी.टी.ए कोणतेही गठण नसताना मनमर्जी फी वाढ करून पालकांची लूट करणे अशा अनेक गंभीर प्रकार या प्रकाराला आपण शासन म्हणून राज्य शासनाचे ऑडिटर पाठवून चौकशी करून पालकांना न्याय द्यावा अशी विनंती पालकमंत्री सुनील केदार यांना माजी आमदार प्रा.राजू तिमांडे व जागृत पालक समितीच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here