देवराव भोंगळे यांच्या आंदोलनाचा एसीसी कंपनीने घेतला धसका

0
108

देवराव भोंगळे यांच्या आंदोलनाचा एसीसी कंपनीने घेतला धसका

अखेर उसगावचा बंद रस्ता आंदोलनापूर्वीच खुला

 

घुग्गुस शहरापासून जवळ असलेल्या एसीसी सिमेंट कंपनीने उसगाव-घुग्गुस रस्ता जो माउंट कार्मेल शाळेला सुद्धा जातो, कोणतीही पूर्वसूचनां न देता रस्त्यावर आडवी भिंत बांधून बंद केला होता. हा रस्ता मंगळवार पर्यंत खुला न केल्यास बुधवारी सकाळी 11 वाजता भिंत पाडून रस्ता खुला करण्यासंदर्भात तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एसीसी सिमेंट कंपनीच्या प्रशासनाला दिली होती.

50 ते 60 वर्षापासून सुरू असलेला उसगावचा रस्ता एसीसी कंपनीने बंद केल्याने उसगाववासी तसेच माउंट कार्मेल शाळेच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याच रस्त्यावर एसीसी कंपनीने कोल डेपो सुरू केला, त्यामुळे शाळेमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. विद्यार्थ्यांना श्वसन तसेच विविध आजाराचा सामना करावा लागत आहे.

ठरल्यानुसार बुधवारला सकाळी अकरा वाजता हजारों कार्यकर्ते सोबत घेऊन देवराव भोंगळे एसीसी कंपनीकडे निघालेसुद्धा परंतु एसीसी कंपनीने आंदोलनाच्या धसक्याने आधीच वॉल कंपाऊंडची भिंत पाडून रस्ता पूर्वव्रत सुरू केला.
आंदोलनस्थळी पोहचून देवराव भोंगळे यांनी प्रशासकीय तसेच एसीसी कंपनी अधिकाऱ्यांसोबत उद्भवलेल्या समस्यांबाबत चर्चा केली. यावर सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. रस्ता पूर्वव्रत सुरू झाल्याने घुग्गुस-नकोडा-उसगाव ग्रामवासियांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने,उसगाव सरपंच निविता ठाकरे, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, काँग्रेस किसान जिल्हाध्यक्ष नेते रोशन पचारे, माजी जि. प. सदस्य चिन्नाजी नलभोगा,धनंजय ठाकरे, प्रेमानंद जोगी, वर्षा ताजने, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, सिनू इसारप, साजन गोहने, राजेश मोरपाका, सतीश बोन्डे, कुसुम सातपुते, सुचिता लुटे,बेगम ताई वैशाली ढवस, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, पुजा दुर्गम, दिनेश बांगडे,तुलसीदास डवस,हसन शेख,सुनील बाम,सचिन कोंडावार , विनोद जनजरला,गणेश कुटेमाटे, बबलू सातपुते, रत्नेश सिंग, मल्लेश बल्ला, सीनु रामटेके,अमीना बेगम,हेमंत कुमार,नाजीम कुरेशी, जनाबाई निमकर, सुनीता पाटील, सिनू सुद्दाला, किशोर नागतुरे, अजगर खान,श्रीकांत सावे,पियुष भोंगळे, विजय माथानकर,स्वप्नील इंगोले,संदीप ठाकरे, पांडुरंग वासेकर, मोहन आवारी,कैलास देरकर, अनिकेत आवारी, अरविंद ठाकरे व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here