घुग्घूस शहरातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व तहसीलदारांना निवेदन

0
124

घुग्घूस शहरातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व तहसीलदारांना निवेदन

 

घुग्घूस हे औद्योगिक शहर असून शहरातील लोकसंख्या बघता शहरातील विकासकामांना जलदगतीने पूर्ण होण्यासाठी शहरात कायमस्वरूपी मुख्याधिकारी हवा होता. मात्र या शहराचे दुर्दैव म्हणा किंवा गलिच्छ राजकारण म्हणा. या शहराला आजपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळू न शकल्याने शहरातील विकासकामांना फुलस्टॉप लागला आहे. शहरातील विविध विकासकामे तातडीने करण्यात यावे याकरिता घुग्घुस काँग्रेस शहर अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज दिनांक 28 फेब्रुवारी ला चंद्रपूर तहसीलदार दिपक पवार व मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना निवेदनातून मागणी केली आहे.

संपूर्ण घुग्घूस शहरातील नाली गटारी ह्या घाणीने तुडुंब भरलेल्या असून त्या तातडीने व नियमितपणे स्वच्छ करण्यात याव्यात. अनेक ठिकाणी नाल्या ह्या तुटलेल्या अवस्थेत आहे त्यांची दुरुस्ती करण्यात यावी.
घुग्घूस शहरातील अनेक ठिकाणी व विशेषतः प्रभाग क्र. 2 वॉर्ड क्र. 6 मध्ये सिमेंट काँक्रीटच्या नाल्याच नसल्याने सर्वत्र पाणी साचलेले आहे.
यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागत असल्याने आवश्यकतेनुसार पाहिजे त्याठिकाणी कच्या स्वरूपाचे नाली बांधकाम करण्यात यावे.
शहरात अनेक ठिकाणी सोलर एनर्जीवर चालनारे ऑटो सोलर पंप नादुरुस्त असून लवकरच उन्हाळा सूरु होणार असल्याने सदर आरो पंप तातडीने दुरुस्ती करावे.
शहरातला उन्हाळा अगदी भीषण असल्याने शहरातील सर्व भागांची चौकशी व पाहणी करून बंद पडलेल्या अवस्थेतील हँडपंप तातडीने दुरुस्त करण्यात यावे.
शहरातील अनेक भागात भूमिगत केबल टाकण्याचे कार्य झालेले आहे किंवा सूरु आहे. याठिकाणी कंत्राटदारांनी योग्य पध्दतीने कार्य केले नसून अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. तर तकाही ठिकाणी अगदी थातूरमातूर पध्दतीने नाल्या बुजविण्यात आल्याने याच्या दगड मातीमूळे नागरिकांना अपघातास समोर जावे लागत आहे, याची तातडीने दुरुस्ती करावी.
शहरातील सिमेंट काँक्रीट रसत्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत या दुरुस्त करण्यात यावे.
शहरातील अनेक भागात गरजेनुसार खडीकरण करून कच्चे रस्ते निर्माण करण्यात आलेले आहेत. या रस्त्यामध्ये नादुरुस्त रस्त्यांचे चौकशी करून दुरुस्त कार्यास तातडीने सुरुवात करावी.
शहरातील अनेक सार्वजनिक नळाला तोट्या नाहीत, तोट्या नसलेल्या नळाला तोट्या बसविण्यात यावे. नळाच्या ठिकाणी ओटा बनवावा व परिसरात उभे राहण्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात यावे.
शहरातील बंद पडलेल्या एटीएमची तपासणी करून बंद पडलेल्या एटीएमची तातडीने दुरुस्त करावी.
शहरातील अनेक ठिकाणी पथदिवे नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अमराई येथील अलीम शेख यांच्या घर परिसरात अनेक महिन्यापासून पथदिवे बंद आहे. या बंद पथदिव्यांची तपासणी करून पथदिवे सूरु करण्यात यावीत.
ओपन स्पेसची स्वच्छता करण्यात यावी.
मुक्या जनावरांना पिण्या करीता पाण्याचे टाके बनवून देण्यात यावे.
रविवार आठवडी बाजारात पार्किंग निर्माण करून देण्यात यावे.
शहरातील तलावाचे सौंदर्यकरणं व खोलीकरण करून देण्यात यावे. आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार सोशल मिडिया अध्यक्ष, रोहित डाकूर, कुमार रुद्रारप, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here