घुग्घुस शहरात घराच्या नळाला पाणी नाही मात्र सर्व नेते उत्साहात?

0
146

घुग्घुस शहरात घराच्या नळाला पाणी नाही मात्र सर्व नेते उत्साहात?

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
घुग्घुस येथील वार्डा-वार्डात घराच्या नळाला पिण्याचे पाणी नियमित येत नाही. नगरपरिषद पुर्ण कर घेते आणि गावचे सर्व पक्ष नेते आवर्जून सांस्कृतिक, रॅलीनृत्य व मनोरंजन कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात मग्न आहेत. असे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

उन्हाळ्यात टँकर नी नि:शुल्क पाणी देण्याचे काम करण्यापेक्षा नगरपरिषदने पाणीटंचाई कडे लक्ष द्यावे, वार्डा-वार्डात पाणी पुरवठा योग्य करू शकत नसेल तर कर माफ केला पाहिजे. जीवनावश्यक पाण्याकडे लक्ष न देता गावचे नेते आपला खिसा गरम करण्यात व्यस्त असल्याची ओरड जनतेत दिसून येत आहे. स्थानिक नेते मंडळी फक्त सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजन नृत्य उत्साह असे कार्यक्रम करण्यात मश्गूल आहेत. मात्र निवडणूक आल्यावर हिच नेते मंडळी नागरिकांना मत मागायला पुढे पुढे येतात त्या वेळेस जनता नक्कीच यांना जागा दाखवून येईल अशी चर्चा दिसून येत आहे.

‘पाणी म्हणजे जीवन’ पण याच पाणी पुरवठा करण्याकडे नेत्यांनी पाठ फिरवल्याने स्थानिक जनतेत प्रचंड असंतोष आहे. नगरपरिषदेने तातडीने सुरळीत पाणी पुरवठा करून स्थानिक जनतेची उन्हाळ्यात तहान भागवावी अशी आर्त हाक जनतेतून दिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here