कारगिल विजय दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ

0
281

कारगिल विजय दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ

पोलीस स्टेशन शेगाव तर्फे आयोजन

तालुका प्रतिनिधी/चिमूर

चंद्रपूर पोलीस विभाग मार्फत जनजागृती अभियान कार्यक्रम अंतर्गत कारगिल विजय दिवसांच्या निमित्ताने पोलीस स्टेशन शेगाव(बु.)तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ कार्यक्रम दि.२६ जुलै ला सकाळी १०.०० वा. स्थानिक लक्ष्मी लॉन टी. पाइंट येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदरील कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी जिला पोलीस अधिक्षक रवींद्र सिंह परदेशी तर प्रमुख अतिथी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी,राकेश जाधव,प्रमुख मार्गदर्शक म्हणून नालंदा अकॅडमी वर्धा चे संचालक अनुप कुमार उपस्थित राहणार आहेत.

सदरील कार्यक्रम चा लाभ स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शेगाव(बु.)पोलीस स्थेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम व आयोजकानीं केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here