घुग्घुस येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न

0
204

घुग्घुस येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न

घुग्घुस येथील श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित ३० ते ३१ डिसेंबर २०२३ रोजी २ दिवस मानवतेच्या महान पुजारी संत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला.

पुण्यतिथी महोत्सव २ दिवसांपासून आयोजन करण्यात आले.तसेच या बरेच वर्षापासून दर आटवड्यात एक दिवसाला ग्राम सफाई अभियान श्री.सत्यशिव गुरुदेव मंडळ व जेष्ठ नागरिक यांच्या नेतृत्वात होत आहे.
३१ डिसेंबर २०२३ रविवार रोजी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त घुग्घुस शहरात श्री. सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने निघालेल्या पालखी सोहळा काढण्यात आले.तसेच लेझीम पथक,सांस्कृतिक रॅलीनृत्य काढण्यात आले.
सांयकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.तसेच सर्व धर्मीय पक्षातील नेते प्रबोधन कार्यक्रम व पालखी रॅली मध्ये आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. मधुकर मालेकर,कोषाध्यक्ष नारायण ठेंगणे, सचिव संजय भोंगळे, उपाध्यक्ष सुरेश बोबडे, राजु काळे, सतीश बोंडे, दिलीप खांडेकर,दिपक पेंदोर,गौरव चौधरी, मंगेश ठाकरे, राहुल ठाकरे,शुभम जेऊरकर ,गौरव ठाकरे, चेतन जेऊरकर, वेदांत पायघन,महीपाल कांबळे,विनू सातघरे तसेच जेष्ठ नागरिक व परिसरातील नागरिक सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here