देवराव भोंगळे यांची अधिकाऱ्यांसमवेत भूस्खलनग्रस्तांच्या पुनर्वसन नियोजित जागेला भेट

0
214

देवराव भोंगळे यांची अधिकाऱ्यांसमवेत भूस्खलनग्रस्तांच्या पुनर्वसन नियोजित जागेला भेट

सफाईच्या कामाची केली पाहणी

घुग्घुस येथील भूस्खलनग्रसतांच्या पुनर्वसनासाठी नियोजित वेकोलि वसाहतीच्या शिवनगर जवळील जागेची व सफाईची शनिवार, ३० डिसेंबर रोजी वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग, राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार,भाजपाचे मल्लेश बल्ला, मोमीन शेख, विक्की सारसर यांनी पाहणी केली.

अमराई वार्डातील भूस्खलनबाधित कुटुंबीयांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे या भूस्खलनबाधितांना जागेचे पट्टे मिळवून देण्यासाठी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पाठपुरावा केला होता.

महसूल व वन विभागाने आपत्तीप्रणव गावाचे पुनर्वसन अंतर्गत अमराई वार्डातील भूस्खलनामुळे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसनाकरीता येथील शासकीय जमीन स. नं. २९/१ आराजी ५९.४७ हे. आर जागेपैकी २.४० हे. आर (६ एकर) जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने १ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here