विरुर येथे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

0
279

विरुर येथे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

विरुर स्टेशन – अविनाश रामटेके

स्व सौ पुष्पादेवी महेंद्र पलोड इंदोर यांच्या स्मृती प्रित्यर्थ लायन्स क्लब चंद्रपूर, कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम वर्धा,आरोग्य विभाग चंद्रपूर, ग्रामीण रुग्णालय राजुरा तसेच गुरुद्वारा सिंग सभा विरुर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही विरूर येथे दि 9 डिसेंम्बर 2023 रोज शनिवार ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व कृत्रिम भिंगारोपन मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा संबंधित गरजू रुग्णांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान गुरुद्वारा सिंग सभा चे प्रमुख श्री सुरेंद्रपाल सिंग बवेजा यांनी केले आहे.
या शिबिरात नेत्रतज्ञ डॉ अजयकुमार शुक्ला कस्तुरबा हेल्थ हॉस्पिटल सेवाग्राम ,डॉ महादेव चिंचोले सिव्हिल सर्जन चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सदर शिबिरात निवड झालेल्या रुग्णांची मोफत कृत्रिम भिंगरोपन शस्त्रक्रिया सेवाग्राम येथे नेत्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शना खाली करण्यात येईल, रुग्णांना गुरुद्वारा सिंग सभा विरुर स्टेशन ते सेवाग्राम नेण्यासाठी व वापस आणण्यासाठी सोय लायन्स आय हॉस्पिटल च्या बसने मोफत करण्यात येईल तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना निवास भोजन औषधे विनामूल्य मिळतील व डोळ्याच्या संरक्षण साठी मोफत चष्मे मिळतील तेव्हा गरजू रुग्णांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान सुरेंद्रपाल सिंग बवेजा, ठाणेदार निर्मल साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी पवार, अनिल आलाम सरपंच विरूर, सतीश कोमरवेलीवार, डॉ. उमप, अजित सिंग टाक, शाहू नारनवरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here