सीएसटीपीएस परिसरात मुक्तसंचार असलेल्या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करा, आ. किशोर जोरगेवार यांची वन विभागाच्या प्रधान सचिव यांना मागणी

0
373

सीएसटीपीएस परिसरात मुक्तसंचार असलेल्या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करा, आ. किशोर जोरगेवार यांची वन विभागाच्या प्रधान सचिव यांना मागणी

अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमूकलीला आई समोरच बिबट्याने उचलून नेल्याची घटना काल सीएसटीपीएसच्या वसाहतीत घडली. या घटनेत चिमूकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसेकर यांची भेट घेतली असून सीएसटीपिएस परिसरात मुक्तसंचार असलेल्या श्वापदांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

चंद्रपूर जिल्हा हा वन संपतीने नटलेला जिल्हा आहे. त्यामुळे येथे जंगली प्राण्यांचाही मोठा वावर आहे. परिणामी येथे वन्यजीव व मानवी संघर्ष नेहमीच निर्माण होत असतो. मात्र आता हा संघर्ष हिंसक होत चालला असून हिंसक वन्य प्राण्यांनी मानवी वस्तींकडची वाट धरली आहे. दरम्यान ऊर्जा नगर वसाहतीत वास्तव्यास असलेल्या उमा शंकर दांडेकर यांची ५ वर्षाची मुलगी लावण्या ही अंगणात खेळत असतांना बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला ओढत घेऊन गेला. यावेळी नागरिकांनी आरडाओरडा करत लावण्याचा शोध घेतला असता ती रस्त्यापासुन अंदाजे ५० ते ६० फुटाच्या अंतरावर सापडली. उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. या हृदय विदारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील हिंसक प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्या जात आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मुबंई येथे वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसेकर यांची भेट घेतली असून सीएसटीपीएस आवारात मुक्त संचार असलेल्या जंगली हिसंक प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. यापुढे अशा घटना न घडतील या बाबतही उपाययोजना करण्यात यावा अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here