बीआरएस उमेदवारांनी थेट स्टॅम्प पेपरवरच लिहून दिलंय शपथ पत्र…

0
283

बीआरएस उमेदवारांनी थेट स्टॅम्प पेपरवरच लिहून दिलंय शपथ पत्र…


चंद्रपूर : राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहेत. या तीन ग्रामपंचायतीत भारत राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत. जिल्ह्यात नव्यानेच एन्ट्री केलेल्या बीआरएसने जनतेला आकर्षित केले आहे. रामपुर ग्रामपंचायत निवडणूकीत उभे असलेल्या बीआरएसच्या उमेदवारानी थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ पत्र लिहून दिले आहे. विजयी झाल्यास गावाचा विकासासाठी काय करणार..? शपथ पत्रात त्यांनी सांगितलं आहे. बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जात आहे. फुसे यांनी थेट विकासाच्या मुद्द्याला हात घातल्याने प्रस्थापितांची कोंडी झाली आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्र आजही मागासलेलं आहे. जीवती, गोंडपिपरी, कोरपणा, राजुरा तालुक्याचा हवा तसा विकास झालेला नाही. या चार तालुक्यात अनेक प्रश्न आजही उभे आहेत. या क्षेत्रातील आमदारांचे विकासा बाबत कमालीचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेत रोष बघायला मिळते. अशातच जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केली. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला चेहरा भूषण फुसे यांच्याकडे धुरा आली.

अल्पावधित बीआरएसने राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विश्वास जिंकला. तेलंगनाला लागून असलेला या भागात “अब की बार, किसान सरकार” नारा गुंजू लागला.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणूकित बीआरएसच्या उमेदवाराची कृती लक्षवेधक ठरली आहे. रामपूर ग्रामपंचायतीत बीआरएसने उमेदवार उभे केले आहे. या उमेदवारानी गावासाठी काय करणार..? हे थेट स्टॅम्प पेपरवर शपथ पत्रच लिहून दिले आहे. सरिता रायपोचम काटन, ज्योती नळे, माधुरी आंबेकर, विजय हजारे, कपिल धेटे, रामपोचम काटम या उमेदवारानी शपथ पत्र लिहिलं. या शपथ पत्राची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.

काय लिहिलं शपथ पत्रात…
उमेदवारांनी शपथपत्रांमध्ये गावविकास करण्याची शपथ घेतली. गावात पाण्याची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिलं. सोबतच गावातील अंतर्गत रस्त्याची निर्मिती करणार, गावाला डुक्कर मुक्त करणार, नाली, कचराकुंडीचे बांधकाम करणार असं शपथपत्रात त्यांनी लिहून दिल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here