सार्वजनिक शौचालयाचे वाहते सांडपाणी ठरत आहे आजारांना आमंत्रण

0
378

सार्वजनिक शौचालयाचे वाहते सांडपाणी ठरत आहे आजारांना आमंत्रण

गडचांदुर — पिंपळगाव जाणाऱ्या रोड ला नगर परिषद चे सार्वजनिक शौचालय आहे आणि त्या सार्वजनिक शौचालयाचा जास्तीत जास्त वापर होत आहे पण त्या सार्वजनिक शौचालयाचे घान पाणी जाण्यासाठी नाली किंव्हा तस्तम सुविधा केलेली नाही त्यामुळे पाणी रस्त्याच्या कडेला व बिलकुल रेल्वे पुलाजवळ जमा होते ज्यामुळे येणार जाणार लोकांना खूप त्रास होत आहे व त्या सार्वजनिक शौचालयाच्या आजू बाजूला लागून असलेल्या घर च्या लोकांना पण त्रास होत आहे . तिथे साचलेल्या पाण्यातून फार घान दुर्गंध येथे, त्या अस्वच्छ पाण्यामुळे परिसरात रोगराईचे प्रमाण वाढते आहे, एकीकडे प्रशासन स्वच्छ भारत मोहीम राबवत आहे तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा शहरातील काही भागात जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असे स्थानिक नागरिकांचे मत आहे

.

या समस्येची जाणीव प्रभागातील दोन्ही नगर सेवक व नगरधक्ष्य यांना पण आहे तरी पण या अस्वचछतेबद्दल कोणीही जबाबदारी स्वीकारत नाही व या विषयावर काहीही उपाययोजना करत नाहीत.

शहरात पहिलंच भरपूर अस्वचतेची जाणीव करून देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत जसे की जागों जागी मोकाट फिरणारे डुकरे, मोकाट कुत्री, जनावरे, रस्त्यावर खडे पडून जागा जागी साचलेले पाणी, त्यापासून होणार्या विविध समस्या ज्याबाबत आतापर्यंत शहरातील विविध मान्यवरांनी निवेदन, आंदोलन करण्याचा इशाराही दिला पण आघाडी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंव्हा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मॅडम यांनीही लक्ष दिले नाही.

स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्या व लवकरात लवकर जर या समस्येचे निवारण केले नाही तर सार्वजनिक शौचालय बंद पाडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here