माता महाकाली महोत्सवासाठी जग प्रसिद्ध जागरणकार लखबीर सिंग लख्खा 19 ऑक्टोबरला चंद्रपूरात

0
242

माता महाकाली महोत्सवासाठी जग प्रसिद्ध जागरणकार लखबीर सिंग लख्खा 19 ऑक्टोबरला चंद्रपूरात

19 ऑक्टोबर पासून सुरु होणार पाच दिवसीय माता महाकाली महोत्सव

19 ऑक्टोबर पासून चंद्रपूरात सुरु होत असलेल्या पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जगप्रसिद्ध देवी गीत जागरणकार लखबीर सिंग लख्खा चंद्रपूरात येणार आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री महाकाली माता समीतीच्या वतीने मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही श्री महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सदर महोत्सव पाच दिवस चालणार असून या दरम्यान महाकाली मंदिर जवळच्या पटांगणात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान 20 ऑक्टोबरला सारेगामा फेम निरंजन बोबडे यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
तर महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आपल्या देवी गीत गायनाने जगात प्रसिध्द असलेले लखबीर सिंग लख्खा यांच्या देवी जागरण गायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे या महोत्सवाचे आकर्षण असणार असून सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. या कार्यक्रमाला महाकाली भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण श्री महाकाली माता सेवा समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

महाकाली महोत्सवाचे मंडप पूजन संपन्न

19 ऑक्टोबर पासून आयोजित श्री माता महाकाली महोत्सवासाठी महाकाली मंदिर जवळील पटांगणात महोत्सवा करिता येणा-या माताच्या भक्तांसाठी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. आज मंगळवारला महाकाली माता महोत्सवाच्या पदाधिका-यांनी विधीवत मंडप पुजन केले. त्यांनतर येथील मंडप उभारणीला सुरवात झाली आहे. या प्रसंगी श्री महाकाली माता सेवा समीतीचे उपाध्यक्ष अजय जयस्वाल, सदस्य बलराम डोडाणी, मोहित मोदी यांच्यासह इतर पदाधिका-यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here