आरतीसंग्रहाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

0
241

आरतीसंग्रहाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई प्रतिनीधी : महेश कदम
सुखकर्ता श्रीगणेशाचे येत्या काही दिवसांत आगमन होणार आहे. बाप्पा हा येताना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. बाप्पाच्या आगमनाची सगळेच वाट बघत असतात. येणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून युवासेना सहसचिव व चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गणेशपूजाविधी व आरतीसंग्रहाचे युवासेना प्रमुख, शिवसेना नेते मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सिनेट सदस्य प्रदिप सावंत, राजन कोळंबेकर, युवा सेना कार्यकारी सदस्य अंकित प्रभू, पवन जाधव, सचिन पाटील, हर्षद कारकर यांच्यासह मयुर कांबळे व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here