भारतीय बौद्ध महासभा शाखा विहार बांधकामास आर्थिक मदत…

0
388

भारतीय बौद्ध महासभा शाखा विहार बांधकामास आर्थिक मदत…


घुग्घुस : दि. २८/०७/२०२३ रोजी स्मृतीशेष प्रतिक उमरे यांचा दिवस न करता त्यांच्या आईने आयूनी शोभाताई उमरे यांनी भारतीय बौद्ध महासभा शाखा घुगुसचे विहार बांधकामात पाच हजार रुपये दान दिले.
या अगोदर त्यांच्या मोठा मुलगा स्मृतीशेष बाळू उमरे यांचा स्मृती दिवस न करता विहार बांधकामास पाच हजार रुपये दान दिले होते. आयुनी शोभा ताई उमरे हे भाजीपाल्याचा छोटा व्यवसाय करतात.

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी आखलेली संकल्पना की आपण वाढदिवस, तिसरा दिवस, लग्नाचा वाढदिवस व अनेक लहान मोठे कार्यक्रम करुन आपण खुप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो आणि त्यामधुन साध्य काहीच होत नाही.
म्हणून आपण हा पैसा खर्च न करता समाजाला दान दिला तर त्या दानातील पैशाचा योग्य वापर करून समाजाची चळवळ उभी होईल.

या वेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, कार्याध्यक्ष चन्द्रगुप्त घागरगुंडे व आयुनी शोभा ताई उमरे, समाज बांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here