रामपूर-माथरा-पोवनी रस्ता जडवाहतुक बंदीस मुदतवाढ

80

रामपूर-माथरा-पोवनी रस्ता जडवाहतुक बंदीस मुदतवाढ

अवजड वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे प्रशासनाचे निर्देश; ३१ मे पर्यंत जडवाहतुक राहणार बंद

राजुरा, ता. २७ : मागील दोन वर्षांपासून पोवनी-गोवरी-रामपूर – राजुरा रस्त्याचे काम सुरू आहे. जडवाहतुकीमुळे रस्ता बांधकाम करण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करणे आवश्यक आहे. रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने या रस्त्यावरील जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली. त्यानुसार बांधकाम विभागाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जडवाहतूक बंद करण्यासंबंधी विनंती केली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यामार्गावरील जडवाहतूक तीन महिन्यांकरिता बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले होते. मात्र या रस्त्यावरील पुलाचे बंधकाम सुरू असल्याने जडवाहतुकीमुळे लहान वाहनांना त्रास होऊ नये व अपघात घडू नये याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या मार्गाला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पोवनी ते रामपूर हे अंतर सात किमीचे आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या मशिनरीचा वापर होत आहे. रस्ता बांधकाम करताना जडवाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जडवाहतूक सुरू ठेवल्यास लहान वाहनास येण्या- जाण्याकरिता रस्ता अपुरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे अवजड वाहतुकदारांना राजुराकडून पडोलीकडे येण्यासाठी राजुरा-रामपूर-सास्ती-पोवनी-हडस्ती-देवडा-दाताळा-पडोली या मार्गाचा वापर करता येईल. तसेच पडोलीकडून राजुराकडे जाण्यासाठी जडवाहतूकदारांना पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती-पोवनी-सास्ती-रामपुर-राजुरा या मार्गाचा वापर करता येणार आहे. पोवनी गोवरी ते राजुरा हा रस्ता जड वाहनांकरिता पूर्णपणे तीन महिने बंद होता. काम पूर्ण न झाल्याने वाढीव तीन महिन्यांकरिता बंद करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने विनंती केली होती. त्याअनुशंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी १ मार्च २०२३ ते ३१ मे २०२३ पर्यंत सर्व प्रकारच्या जडवाहनांना वाहतुकीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

advt